
कोल्हापूरच्या राजकारणातला युवा अंदाज ऋतुराज
लीड
कोल्हापूर दक्षिणची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या युवा आमदार आणि तरुणाईचे आयकॉन असलेले ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे समाजकारण भक्कमपणे पुढे नेण्याचे कार्य केले आहे. आजोबा, वडील आणि काकांचा वारसा निःशंकपणे पेलण्याचे काम त्यांनी केले आहे. सतेज पाटील यांनी निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे चांगल्या पध्दतीने सांभाळण्याचे काम ऋतुराज पाटील करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या झंझावती कार्याचा आढावा.
- प्रवीण जाधव, गांधीनगर.
फोटो आमदार ऋतुराज पाटील
तरुणाईचे आयकॉन
आजोबा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची आध्यात्मिकता, वडील डॉ. संजय पाटील यांचे संस्थात्मक, संघटनात्मक कार्य आणि काका पालकमंत्री सतेज पाटील यांनी २० वर्षांत निर्माण केलेला समाजकारणातील भक्कम जनाधार पुढे नेण्याचे कार्य आमदार ऋतुराज यांनी केले आहे. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे?,
हे ऋतुराज यांनी दाखवून दिले आहे. महाविद्यालयीन जीवनात समाजकारण आणि राजकारणाचे धडे गिरवायला शिकलेल्या ऋतुराज यांनी २००७ ला शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थीदशेतील निवडणूक जिंकून आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखविली. अमेरिकेतील पेनसिल्वानिया येथील विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी समाजकार्यात झोकून दिले. सयाजी हॉटेल हे कोल्हापुरातील पहिले पंचतारांकित हॉटेल सुरू करुन हजारो लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचे काम त्यांनी केले. महापालिकेच्या निवडीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यानंतर आलेल्या सर्वच निवडणुकांत त्यांनी युवकांत चैतन्य निर्माण केले. युवक महोत्सव साजरे करताना सुप्रसिध्द पार्श्वगायक अरिजितसिंग, संगीतकार अजय-अतुल, कपिल शर्मा यांच्यासारख्या तरुणाईला आवडणाऱ्या सेलिब्रेटींना कोल्हापुरात आणले. नव्या युगातील तरुणाईचे आयकॉन बनत असतानाच त्यांच्या गरजा ओळखून त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरु केली. ऋतुराज पाटील फाऊंडेशन सुरु करुन त्यांनी तरुणाईला एक नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. युती काळात वेगवेगळ्या समस्यांवर निघालेल्या मोर्चांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केले. २०१९ ला महापुरात त्यांनी पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य केले. ९० टक्के पूरग्रस्त असलेल्या वळिवडे गावाला दत्तक घेऊन गावात पूर ओसरल्यानंतर आलेल्या समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसचे तत्कालीन प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या पक्षश्रेष्ठींच्या हस्ते पूरग्रस्तांसाठी आधार देण्याचे काम केले. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कोल्हापूर दक्षिणची उमेदवारी मिळाली. अगदी अभिनव पध्दतीने त्यांनी सायकल रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी सगळा परिसर पिंजून काढला. येथील कार्यकर्त्यांना २००४ ची सतेज पाटील यांच्या निवडणुकीची आठवण व्हावी, अशा पदयात्रा होऊ लागल्या. प्रचार करताना त्यांच्या साधेपणाचे रूप लोकांना भावले. मंत्री सतेज पाटील यांनी गायिलेल्या दक्षिणचा एकच आवाज ऋतुराज या गाण्यातून ते घरांघरांत पोहोचले. त्यांनी केलेल्या कष्टाचे निकालात रूपांतर झाले. प्रचंड मतांनी ऋतुराज पाटील निवडून आले. आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी कार्याला सुरुवात केली. तोपर्यंत कोरोनाचे जागतिक संकट सामोरे आले.
या संकटामध्ये सर्वसामान्यांसाठी जे करता येईल त्यासाठी ऋतुराज पाटील धडपडत होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून ते रुग्णसेवा देत होते. कोरोनाच्या काळात लोकांना मदत करण्याचे व्रत त्यांनी अंगीकारले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजर्षी शाहू फूड व्हॅनसाठी त्यांनी मदत केली. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी रोजगार मेळावे घेतले. विद्यार्थी, गृहिणी, युवक, कामगार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच घटकांसाठी त्यांनी नियोजनबध्द प्रयत्न केले. फक्त राजकारण न करता त्याला समाजकारणाची योग्य जोड देण्याचे काम त्यांनी केले. पक्षीय पातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य सरचिटणीसपद देऊन पक्षाचे कार्य वाढविण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. संजय पाटील, मंत्री सतेज पाटील यांच्या आशीर्वादाने आणि पत्नी पूजा , बंधू पृथ्वीराज आणि तेजस यांच्या सोबतीने आमदार ऋतुराज पाटील चांगली वाटचाल करत आहेत. राज्याच्या युवा नेत्यांत त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे. फक्त कोल्हापूर दक्षिणच नव्हे तर जिल्हा आणि राज्यपातळीवरील कार्याने सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी ऋतुराज पाटील प्रयत्न करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01143 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..