उचगावच्या संदीप हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगावच्या संदीप हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
उचगावच्या संदीप हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

उचगावच्या संदीप हॉटेलचा परवाना कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

sakal_logo
By

उचगावातील हॉटेलचा
परवाना कायमस्वरूपी रद्द
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड
सकाळ वृत्तसेवा
गांधीनगर, ता. १९ : उचगाव पूर्व (ता. करवीर) येथील हॉटेल संदीप व बिअर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. नकुल शंकरराव पाटील यांच्या तक्रार अर्जावरील सुनावणीनंतर हा निर्णय झाला.
हॉटेल संदीपला परवाना मिळवताना गांधीनगरचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक उदय डूबल आणि राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन अधीक्षक, दुय्यम निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांनी अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नकुल पाटील यांनी तक्रारीत केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले आणि राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीमध्ये संदीप पाटलुबा पाटील याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून हॉटेल संदीप, संदीप परमिट रूम व बिअर बार आणि संदीप लॉजिंगला निवासी वस्तीत परवाना मिळवल्याचे नकुल पाटील यांनी निदर्शनास आणले. राज्य महामार्ग अंतर निर्बंधमुक्त असल्याचा खोटा दाखला राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन अधीक्षक दुय्यम निरीक्षक यांनी दिल्याचे उघड झाले. सादर केलेले कागदपत्रात केलेले फेरफार, पुरावे आणि सुनावणीअंती जिल्हाधिकारी रेखावार यांनी हॉटेलचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01198 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..