उचगावात 41 हजारांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगावात 41 हजारांची चोरी
उचगावात 41 हजारांची चोरी

उचगावात 41 हजारांची चोरी

sakal_logo
By

शटर उचकटून
मुद्देमाल पळविला
उचगावात घटना; गॅस शेगड्यांचा समावेश
गांधीनगर, ता. २३ : गांधीनगर मुख्य रस्त्यावर उचगाव (ता. करवीर) हद्दीत असणाऱ्या मोहित ट्रेडर्स या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मोहित सुरेशचंद गुप्ता (वळीवडे, ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गांधीनगर मुख्य रस्त्यावर तावडे हॉटेल शेजारी मोहित ट्रेडर्स नावाचे गॅस शेगडी विक्रीचे दुकान आहे. दुकान मालक गुप्ता हे रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. चोरट्याने पहाटे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील गॅस शेगडीच्या पितळी वाट्या, तसेच अन्य साहित्य असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विराज डांगे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01202 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..