मुसळधार पावसामुळे लोकरी मावा धुवून निघाला, शेतकरी सुखावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुसळधार पावसामुळे लोकरी मावा धुवून निघाला, शेतकरी सुखावला
मुसळधार पावसामुळे लोकरी मावा धुवून निघाला, शेतकरी सुखावला

मुसळधार पावसामुळे लोकरी मावा धुवून निघाला, शेतकरी सुखावला

sakal_logo
By

लोकरी मावा धोका
पावसामुळे झाला कमी

प्रविण जाधव ः सकाळ वृत्तसेवाः
गांधीनगर, ता. ७ः पावसामुळे ऊसावर पडलेल्या लोकरी माव्याची किड धुऊन निघाली आहे. त्यामुळे करवीर पूर्व परिसरातील शेतकरी सुखावला आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस पडल्यामुळे पिकांची चांगली वाढ होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यावर्षीचा पाऊस सुरु झाला आणि शेतीतील कामे खोळंबली. सुमारे तीन आठवडे पाऊस पडल्यानंतर पंधरा दिवस पाऊस एकदम नाहिसा झाला. ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. तशातच करवीर पूर्व परिसरातील ऊस पिकावर लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. करवीर पूर्व परिसरातील ऊस पिकावर लोकरी माव्याचे संकट वाढू लागले होते. शेतकरी आपापल्या परीने पिकाचे रक्षण करत होते. लोकरी माव्याची किड कमी होण्यासाठी वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या सुरु होत्या. काही दिवसापूर्वी अचानकपणे मुसळधार पाऊस आला. सुमारे तीन ते चार तास पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसामुळे पिकांच्या वाढीला मदत होणार आहे.

कोट
गेल्या तीन आठवड्यापासून परिसरामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. शेतकरी आपापल्या परीने वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या घेत होते. परंतु कालच्या पावसाने ऊसाच्या पानांवरील लोकरी मावा मोठ्या प्रमाणात नाहिसा झाला. कालच्या पावसामुळे शेतकऱ्याला लाभ झाला आहे.
-लक्ष्मण पाटील, शेतकरी, वळिवडे.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01217 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..