पान ३ क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३  क्राईम
पान ३ क्राईम

पान ३ क्राईम

sakal_logo
By

बँकेची फसवणूकप्रकरणी
इचलकरंजीत तिघांवर गुन्हा
इचलकरंजी : कर्ज घेऊन खरेदी केलेले अत्याधुनिक १२ यंत्रमाग हे बँकेच्या परवानगीशिवाय विक्री केल्याप्रकरणी तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. प्रवीण सुभाष बर्गे, प्रमोद सुभाष बर्गे (दोघे इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. अन्य एक संशयित यापूर्वी मयत झाला आहे. याप्रकरणी ५० लाखांची फसवणूक व अपहार झाल्याची फिर्याद बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी उमेश शिंदे यांनी दिली. येथील बरगे मळ्यात राहणारे प्रवीण बर्गे, प्रमोद बर्गे यांसह एका संशयितेसह तिघांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधून ५० लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यातून १२ अत्यानुधीक यंत्रमाग खरेदी केले होते. हे यंत्रमाग बँकेच्या परवानगीशिवाय परस्पर विल्हेवाट लावून बँकेची फसवणूक केल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. ही घटना २४ मार्च २०१७ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी बँकेचे उमेश शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

मारहाणप्रकरणी चौघे ताब्यात
गांधीनगर : दुकानासमोर लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याचा मनात राग धरून चौघांनी विनीत राजकुमार धरदासानी (वय १९, हरिओम प्लाझा बिल्डिंग, हुले मळा गांधीनगर) यास दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवागीळ करून मारहाण केली. मारामारीची घटना शनिवारी घडली. प्रवीण खिलारी, गणेश खिलारी, चांगदेव काळे, बाबासाहेब बाड (सर्व सरनोबतवाडी) या चौघांना गांधीनगर पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. मुख्य रस्त्यावर निगडेवाडी येथे दुकानात विनित कामाला आहे. तेथे दुकानासमोर वरील चौघांनी गाड्या लावल्या होत्या. विनीतने दुकानासमोरील गाडी काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरून वरील चौघां संशयितांनी प्रथम पुणे बेंगलोर महामार्गावर उचगाव चौकात व नंतर निगडेवाडी येथे विनीत यास मारहाण केली. या प्रकरणी चौघांसह इतर अनोळखीवर गुन्हा नोंद झाला.

बिद्रीत एटीएम मशीनला आग
बिद्री : येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. आगीत इलेक्ट्रीक वायरिंग आणि फर्निचरचा काही भाग जळून खाक झाला. आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बिद्री कारखाना बस स्थानकाशेजारी अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास एटीएमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. एटीएममधून धूर बाहेर येत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी बिद्री कारखान्याच्या अग्निशमन विभागाला कळविले.
अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याने पाण्याचा मारा न करता कर्मचाऱ्यांनी अग्निशामक नळकांडे फोडून आग विझवली. याबाबत बँकेच्या वरिष्ठांशी संपर्क होऊ न शकल्याने नेमके किती रुपयांचे नुकसान झाले ते समजू शकलेले नाही. मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत गोंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत त्यांनी बँकेशी संबंधित हिताची कंपनीचे चॅनेल एक्झिक्युटिव्ह संतोष कापसेकर यांना दूरध्वनीवरून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.जुगार खेळणाऱ्या
१० जणांवर कारवाई
असळज : मुटकेश्वर (ता. गगनबावडा) येथे जुगार खेळणा-या दहा जणांवर गगनबावडा पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मुटकेश्वर येथे आज दुपारी उघड्यावर बसून अमित विलास पाटील (वय ३८), बाजीराव पांडुरंग पाटील (वय ५५), संजय शंकर कांबळे (वय ५०), किशोर रंगराव सुतार (वय ३२), प्रवीण शिवाजी सुतार (वय २७) (सर्व मुटकेश्वर), प्रकाश मरगू कांबळे (वय ३५), दीपक ज्ञानू कांबळे (वय ३४), नमकुमार श्रीपती कांबळे (वय ३४) (सर्व खडूळे), रामदास शामराव मोळे (वय ४५), धोंडीराम बाबू कुरणे (वय ४३, मुटकेश्वर) हे दहाजण तीन पानी जुगार खेळत होते. त्यांच्याकडून १२२३० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत गगनबावडा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01222 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..