पान ८ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८
पान ८

पान ८

sakal_logo
By

वळिवडेत उद्या
अहिंसा, व्यसनमुक्ती रॅली
गांधीनगर, ता. १४ : युवकांना व्यसनमुक्त बनवून शक्तिशाली समाज घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालून महाराष्ट्रात आदर्श स्थापन केलेले स्व. वीराचार्य अॅड. बाबासाहेब कुचनुरे यांच्या १६ ऑगस्टला येणाऱ्या ३४ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वळिवडे (ता. करवीर) येथे अहिंसा, शाकाहार, व व्यसनमुक्ती रॅलीचे आणि विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प.पू.१०८ गुरुदेव संमंतभद्रजी महाराज यांचा आदर्श पुढे चालवण्यासाठी कामाचे आयोजन केले, अशी माहिती क्रांतिरत्न आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार (ता. १६) सकाळी आठ वाजता कोल्हापूरचे आरटीओ दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सकाळी दहा वाजता भव्य अहिंसा शाकाहार व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन केले आहे. रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे यांच्या हस्ते होणार आहे. घोडे, रथ, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही रॅली निघणार आहे. दुपारी दोन वाजता मुख्य समारंभ व विशेष सन्मान कार्यक्रम होणार आहे. त्याचे अध्यक्ष सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण विमलनाथ चतूर हे असून साखर आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, कल्पना होरे, व निवृत्त जीएसटी कमिशनर सुमेरकुमार काला यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नवनियुक्त नायब तहसीलदार सोनाली पाटील यांचा विशेष सन्मान होणार आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी मंत्री, आमदार, खासदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय सेवेतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी चार वाजता प.पू. आचार्य श्री १०८ चंद्रप्रभसागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01223 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..