अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती काळाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती काळाची गरज
अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती काळाची गरज

अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती काळाची गरज

sakal_logo
By

वळिवडे ः येथे अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्ती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि उपस्थित समुदाय.

शाकाहार, व्यसनमुक्ती काळाची गरज
आमदार ऋतुराज पाटील; वळिवडे येथे रॅलीचे उद्घाटन
गांधीनगर, ता.२१ः अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. समाजामधील बंधुभाव वाढून सलोखा निर्माण होण्यासाठी ही तत्वे अत्यंत उपयोगी असून, परमपूज्य युवा सम्राट १०८ श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांचे कार्य तरुण पिढीला दिशादर्शक आहेत असे आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. वळिवडे (ता. करवीर) येथे आयोजित अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्ती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आमदार पाटील म्हणाले की, करवीर नगरीत पहिल्यांदाच अशी रॅली होत आहे. व्यसनमुक्ती, शाकाहार सारख्या रॅली होणे ही काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, रॅलीच्या माध्यमातून समाजाला समता, बंधुता आणि व्यस्नमुक्तीचा संदेश मिळेल. सर्वांनी तो संदेश आचरणात आणावा.
येथे विद्या सन्मतिदास पावन वर्षायोगनिमित्त परमपूज्य युवा सम्राट १०८ आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांचा सहसंघ चातुर्मास सुरू आहे. तसेच स्वर्गीय वीर शिरोमणी वीराचार्य अॅड. बाबासाहेब कुचनुरे यांच्या ३४ वी पुण्यतिथीनिमित्त तसेच गुरुकुल शिक्षण प्रणाली सुरू करुन महाराष्ट्रात आदर्श निर्माण करणारे गुरुदेव समंतभद्रजी महाराज यांची पुण्यतिथी होती. यानिमित्त अहिंसा, शाकाहार आणि व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन केले होते. आमदार पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीचे उद्घाटन झाले. १०८ श्री आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज यांनी मंत्रजप करुन मंत्रमुग्ध केले.
रॅलीमध्ये ५२ घोडे, हत्ती, ८ रथ, २ बँडपथके, १८ ट्रॅक्टर, १२ ढोलताशा पथकासह हजारो श्रावक-श्राविकांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01228 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..