ग्रामसेवकास धक्काबुक्की प्रकरणी गांधीनगरचे चौघे ग्रा.पं. सदस्य निर्दोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामसेवकास धक्काबुक्की प्रकरणी गांधीनगरचे चौघे ग्रा.पं. सदस्य निर्दोष
ग्रामसेवकास धक्काबुक्की प्रकरणी गांधीनगरचे चौघे ग्रा.पं. सदस्य निर्दोष

ग्रामसेवकास धक्काबुक्की प्रकरणी गांधीनगरचे चौघे ग्रा.पं. सदस्य निर्दोष

sakal_logo
By

गांधीनगर, ता. १४: गांधीनगर(ता. करवीर) येथील तत्कालीन ग्रामसेवक रायसिंग गोरजी वळवी यांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपातून माजी उपसरपंच राकेश उर्फ गुड्डू सचदेव, ग्रामपंचायत सदस्य प्रताप चंदवाणी, सुनील जेसवानी आणि सागर उदासी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
२४ मे २०१६ रोजी गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक वळवी सेवा बजावत होते. वळवी यांच्याबरोबर पाणीपुरवठ्याच्या कारणावरून माजी उपसरपंच राकेश उर्फ गुड्डू सचदेव, ग्रा.पं. सदस्य प्रताप चंदवानी, सुनील जेसवानी आणि सागर उदासी यांच्यात वादावादी झाली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणून वळवी यांना धक्काबुक्की केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तदर्थ जिल्हा न्यायाधीश (क्र. १) एस. एस. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. ग्रामविकास अधिकारी वळवी नागरिकांशी गैर वागतात, ग्रामपंचायत सदस्यांना न जुमानता ते सेवा बजावत असल्याने एकमेकांशी त्यांचे पटत नव्हते. सेवेबद्दल जाब विचारणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांवर वळवी यांचा राग असल्यानेच त्यांनी सरकारी कामात अडथळा आणून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला, असा अॅड. संजय घाटगे यांचा युक्तिवाद न्या. एस. एस. जगताप यांनी ग्राह्य मानून माजी उपसरपंचासह चौघा ग्रा.पं. सदस्यांची निर्दोष मुक्तता केली.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01247 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..