उचगाव येथे कंटेनरच्या धडकेत अज्ञात महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगाव येथे कंटेनरच्या धडकेत अज्ञात महिला ठार
उचगाव येथे कंटेनरच्या धडकेत अज्ञात महिला ठार

उचगाव येथे कंटेनरच्या धडकेत अज्ञात महिला ठार

sakal_logo
By

गांधीनगर, ता. २३: पुणे-बंगळूर महामार्गावर उचगाव (ता. करवीर) येथील फोर्ड शोरूम समोर अज्ञात महिला अचानक कंटेनरच्या (क्र.एम एच 43-वाय 9940) आडवी आल्याने गंभीर जखमी झाली. तिचा कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान झाला.
कंटेनर नवी मुंबईहून चेन्नईकडे जात होता. कंटेनर पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव येथील फोर्ड शोरूम समोर आला असता अचानक हातात भाजीची पिशवी असलेली अज्ञात महिला आडवी आली. कंटेनर चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा तिला कंटेनरची जोरदार धडक बसल्याने तिच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा पोचली. तिला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. याबाबतची वर्दी कंटेनर चालक राधेश्याम राघव गौड (रा. भैसामाफी, जि. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. विकास ट्रान्सपोर्ट पनवेल, नवी मुंबई) याने याबाबतची वर्दी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01263 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..