गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

गांधीनगर बाजारपेठेत दिवाळी सणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

sakal_logo
By

गांधीनगरमधील वाहतूक व्यवस्थेत बदल
सत्यराज घुले; दिवाळीच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने निर्णय

गांधीनगर, ता. १६ : दिवाळीच्या खरेदी विक्रीसाठी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने येथील बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत आणि पार्किंग व्यवस्थेत १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत तात्पुरता बदल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले यांनी दिली.
पादचारी ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी अवजड, जड व मध्यम मालवाहतूक करणाऱ्या मोटर वाहनांना बाजारपेठेतील प्रवेशास व माल चढउतार करण्यास मनाई केली आहे. यामध्ये अत्यावश्यक व प्रशासकीय वाहनांना वगळले आहे.

चौकट
असे असतील बदल
*सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत तनवाणी कॉर्नरपासून गांधीनगरकडे मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे.
*गणेश टॉकीज ते वळिवडे कॉर्नर मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे.
*चिंचवाड, वळिवडेत जाण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो, नागरिकांच्या वाहनांना कोयना कॉलनी, सरकारी दवाखानामार्गे वळिवडेत किंवा चिंचवाडत जाता येईल.
* ट्रान्स्पोर्ट लाईनच्या अवजड, जड वाहनांना ये -जा करण्यासाठी तावडे हॉटेल, उचगाव फाटा, गडमुडशिंगी, चिंचवाड मार्गे गांधीनगर असा आहे.
*ट्रान्स्पोर्ट लाईनमधून गांधीनगर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना माल देण्या-घेण्यासाठी रिक्षा, मिनी टेम्पो यातून रात्री दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मुभा आहे.

चौकट
येथे असेल पार्किंग
चार चाकी आणि दुचाकी ः केसरकर पार्किंग, किनारा साडी सेंटर मागे, पोवार मळा, लोहिया मार्केटचे मैदान येथे वाहनतळ आहे.