उचगावमध्ये हॉटेलचालकावर हत्याराने वार# चौघावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगावमध्ये हॉटेलचालकावर हत्याराने वार# चौघावर गुन्हा दाखल
उचगावमध्ये हॉटेलचालकावर हत्याराने वार# चौघावर गुन्हा दाखल

उचगावमध्ये हॉटेलचालकावर हत्याराने वार# चौघावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

हॉटेलचालकाला मारहाण
गांधीनगर, ता. २३: हॉटेलचालक सचिन तानाजी राठोड (रा. श्रीरामनगर, उचगाव) जेवायला जात असताना त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून, दगडाने मारहाण करून जखमी केल्याबद्दल आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देवदास अविनाश सकट (वय २०, रा. स्वातंत्र्यसैनिक वसाहत, राजेंद्रनगर कोल्हापूर), संभाजी शिंगाडी मुदाळे, सुजाता संभाजी मुदाळे, विशाल संभाजी मुदाळे (सर्व सध्या रा. रेडेकर गल्ली उचगाव, मूळ रा. हुपरी, ता. हातकणंगले) यांच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार शनिवारी रात्री उचगाव (ता. करवीर) येथील रेडेकर गल्लीत झाला.
जखमी राठोड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राठोड हे रेडेकर गल्ली येथे जेवायला जात असताना देवदास सकट याने धारदार हत्याराने त्यांना वार करून जखमी केले. त्याचवेळी संभाजी मुदाळे याने राठोड यांना दगडाने मारहाण केली.