वळीवडेत अपघातामधील मृत मायलेकावर अंत्यसंस्कार# वळीवडेवर शोककळा : पोवार कुटुंबीयांचे लोकप्रतिनिधी, प्रांताकडून सांत्वन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळीवडेत अपघातामधील मृत मायलेकावर अंत्यसंस्कार# वळीवडेवर शोककळा :  पोवार कुटुंबीयांचे लोकप्रतिनिधी, प्रांताकडून सांत्वन
वळीवडेत अपघातामधील मृत मायलेकावर अंत्यसंस्कार# वळीवडेवर शोककळा : पोवार कुटुंबीयांचे लोकप्रतिनिधी, प्रांताकडून सांत्वन

वळीवडेत अपघातामधील मृत मायलेकावर अंत्यसंस्कार# वळीवडेवर शोककळा : पोवार कुटुंबीयांचे लोकप्रतिनिधी, प्रांताकडून सांत्वन

sakal_logo
By

पोवार मायलेकांवर वळिवडेत अंत्यसंस्कार
गांधीनगर, ता. १: कार्तिकी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर जुनोनी येथे सोमवारी झालेल्या अपघातात वळिवडे (ता. करवीर) येथील सुनीता उत्तम पोवार (वय ४५) आणि गौरव उत्तम पोवार (वय १२) या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर आज वळिवडे येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत सुनीता यांचे पती उत्तम यांचा तेरा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर सुनीता पोवार या गांधीनगर येथील हेमू कलानी प्रायमरी स्कूलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचा मुलगा गौरव गांधीनगर हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. त्यांनी कष्टाने संसार करत दोन मुलींना शिकवून त्यांचे लग्न केले. अशा काबाडकष्ट करणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातल्याने पोवार कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली. आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी पोवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. ही मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार ताबडतोब करण्यात येतील. लवकरच मदत या कुटुंबापर्यंत पोहोचेल, असे प्रांताधिकारी नावडकर यांनी सांगितले.