अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला बालविवाह: दोघा जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला बालविवाह: दोघा जणांवर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला बालविवाह: दोघा जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केला बालविवाह: दोघा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीशी
विवाहप्रकरणी दोघांना अटक

गांधीनगर, ता. १३: पहिली पत्नी जिवंत असताना दुसऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्याशी विवाह केल्याप्रकरणी सुशांत श्रीकांत कांबळे (रुकडी, ता. हातकणंगले) याच्यासह बालविवाहास मदत करणाऱ्या रणजित पुंडलिक कांबळे (गडमुडशिंगी, ता. करवीर) अशा दोघांवर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित सुशांत याने पहिली पत्नी जिवंत असताना पीडित अल्पवयीन मुलीला खोटे सांगून तिला पळवून नेले. तसेच २३ मे ला लग्न केले. दरम्यान, अल्पवयीन पीडित मुलीला संशयित सुशांतपासून दिवस गेले. या सर्व प्रकरणी रणजित कांबळे याने बालविवाहासाठी मदत केली, अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा समुपदेशक केंद्रात दिली होती. त्या तक्रार अर्जाची निर्भया पथकाकडून तपासणी होऊन गांधीनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला. संशयित दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोनिका खडके करत आहेत.
----------