नकली सोने तारण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल. आकरा लाखांची फसवणूक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नकली सोने तारण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल. आकरा लाखांची फसवणूक.
नकली सोने तारण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल. आकरा लाखांची फसवणूक.

नकली सोने तारण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल. आकरा लाखांची फसवणूक.

sakal_logo
By

११ लाखांची फसवणूक;
आठ जणांवर गुन्हा दाखल

गांधीनगर, ता. २२ : उचगाव (ता. करवीर) येथील एका बँकेच्या शाखेत नकली सोने तारण ठेवून अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपयांची फसवणूक करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सुहास साताप्पा मोहिते सरकार (रा. मोरे माने नगर, कोल्हापूर), सुरेश चंद्रकांत पोवार (रा. बेघर वसाहत, यवलूज), विलास भीमराव बदले (रा. हनुमान नगर, शिये), हर्षद कुंडलिक पोवार (रा. महादेव नगर, दोनवडे), शुभम संदीप मिरजे (रा. निंबाळकर कॉलनी, कावळा नाका, कोल्हापूर), सचिन कृष्णा पोवार (रा. पोवार लाइन, सातर्डे), अशोक मारुती नाळे, अवधूत संजय शिंदे (दोघेही वाल्युएशन कर्मचारी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, बँकेचे व्हॅल्युएशन कर्मचारी अशोक नाळे, अवधूत शिंदे यांच्याशी संगनमत करून सुहास मोहिते, सुरेश पोवार, विलास बदले, हर्षद पोवार, शुभम मिरजे, सचिन पोवार यांनी बँकेमध्ये नकली सोने तारण ठेवून दहा लाख चवेचाळीस हजार तीनशे चाळीस रुपयांचे कर्ज घेतले. या सहा कर्जदारांनी कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याज भरले नाही. त्यामुळे व्याजासहित ही रक्कम अकरा लाख पस्तीस हजार आठशे अकरा रुपये इतकी झाली. याप्रकरणी बँक प्रशासनाने शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला. शाखा व्यवस्थापक पृथ्वीराज विजयसिंह पाटील (रा. महाडिक वसाहत, कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.