उचगावात महिला पोलिसांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला; दोन ठिकाणी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उचगावात महिला पोलिसांच्या घरी चोरट्यांनी मारला  डल्ला; दोन ठिकाणी चोरी
उचगावात महिला पोलिसांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला; दोन ठिकाणी चोरी

उचगावात महिला पोलिसांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला; दोन ठिकाणी चोरी

sakal_logo
By

2266
उचगाव (ता करवीर)ः येथे चोरट्यांनी फोडलेले कपाट.
........

उचगावमध्ये पोलिसाच्या घरावरच डल्ला

गांधीनगर, ता. ११ : उचगाव (ता. करवीर) येथे मंगेश्वर गल्ली राजदीप कॉलनी येथील पोलिस हेड कॉन्स्टेबल हेमा सुभाष पाटील यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. शनिवारी पहाटे दोन बंद घराचे दरवाजाचे कुलूप उचकटून तसेच शेजारच्या खिडकीचा गज वाकवून घरात प्रवेश करून घरातील दागिने व रोख रक्कम असा एकूण २३,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
याबाबत गांधीनगर पोलिसांत हेमा सुभाष पाटील (वय ४९, रा. प्लॉट नंबर १३, राजदीप संकुल कॉलनी, उचगाव ता. करवीर) यांनी फिर्याद दिली. तसेच फिर्यादी शेजारी राहणाऱ्या शशिकांत कृष्णा सुतार यांच्या घरीही चोरी झाली.
पोलिस हेड कॉन्स्टेबल हेमा सुभाष पाटील या भावाचा अपघात झाल्याने बाहेर गेल्या होत्या. तर शशिकांत कृष्णा सुतार हे आई वारल्यामुळे चंद्रे या गावी गेले होते. बंद घराचे कुलूप तोडून व खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल हेमा पाटील यांच्या घरातील कपाट विस्कटून घरातील ७००० रुपये, ११० ग्रॅम वजनाचे आरतीचे चांदीचे ताट, दोन लहान चांदीचे निरजंन, दोन हळदी कुकंवाच्या चांदीच्या लहान वाट्या, बाळाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या असा एवज लंपास केला. तर शशिकांत सुतार यांच्या घरातून ४००० रुपये रोख रक्कम चोरट्याने लंपास केला.