किरकोळ कारणावरुन वसगडेत दोघांना मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरुन वसगडेत दोघांना मारहाण चौघांविरोधात गुन्हा दाखल

वसगडेत किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण

गांधीनगर ः किरकोळ कारणावरून अजित सुरेश धनगर (वय १९, रा. वसगडे, ता. करवीर) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याबद्दल प्रथमेश राजू गवळी, तुषार पांडुरंग कांबळे, गिरीश रामचंद्र कांबळे, सोहम सर्जेराव कांबळे (सर्व, रा. समाज मंदिराजवळ, वसगडे) या चौघांविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबतची अधिक माहिती अशी, वसगडे येथे एका महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सुरू आहे. या योजनेतील मुला-मुलींचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरू असताना सोहम कांबळे हा कट्ट्यावर नृत्य करत होता. त्यावेळी अजित धनगर याने नृत्य करू नकोस, तुझा हात मला लागत आहे, असे सांगितले. यावर सोहम याने, तू मला कोण सांगणार असे म्हणत तेथेच नृत्य केले. कार्यक्रम संपल्यानंतर अजित घरी जात असताना सोहम कांबळे, प्रथमेश गवळी, तुषार कांबळे, गिरीश कांबळे यांनी त्याला अडवून खापरीने मारहाण केली. तसेच अजितचा मित्र रोहित शिंदे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत अजित धनगर याने फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस नाईक आयुब शेख करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com