वळिवडेत किरकोळ कारणांवरून  मारामारी; एक जण जखमी

वळिवडेत किरकोळ कारणांवरून मारामारी; एक जण जखमी

वळिवडेत ग्रामपंचायत सदस्याकडून एकास मारहाण

गांधीनगर: वळिवडे (ता. करवीर) येथे ‘माझ्या हद्दीत असणारी पानपट्टी का उघडलीस’ या कारणावरून वळिवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजीत सन्मत दिगंबरे (वय ३४, रा. हरिप्रिया अपार्टमेंट, वळिवडे) यांनी महेश सुभाष शेळके यांना दगडाने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद महेश शेळके (वय ३१, रा. वळिवडे ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली. याबाबतची अधिक माहिती अशी की, चिंचवाड रोड वळिवडे कॉर्नर येथे शेळके हे आपल्या पानपट्टीची साफसफाई करत असताना विश्वजित दिगंबरे यांनी माझ्या हद्दीत असणारी पानपट्टी का उघडलीस, पानपट्टीची जागा कोणाची आहे हे तुला माहीत आहे का? असे विचारले असता शेळके यांनी पानपट्टीची जागा ही सरकारी आहे, असे सांगितले. यावरून बाचाबाची झाल्याने दिगंबरे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शेळके यांनी पोलिसांत दिली. यानुसार दिगंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com