गांधीनगरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जणं जखमी  जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार ग्रामपंचायत प्रशासन सुस्तच

गांधीनगरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जणं जखमी जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार ग्रामपंचायत प्रशासन सुस्तच

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात
गांधीनगरमध्ये १४ जण जखमी

गांधीनगर, ता. ४: गांधीनगर (ता. करवीर) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १४ जण जखमी झाले. हा प्रकार शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. जखमींवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात उपचार सुरू असून काही जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे गांधीनगर परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मराठी शाळा, मोहिते मळा परिसर, शिरू चौक रोड या परिसरातील नागरिकांवर या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार महिला, तीन मुले आणि सात पुरुष असे एकूण १४ जण जखमी झाले आहेत. गांधीनगरातील सामाजिक कार्यकर्ते स्टीफन बिरांजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला.
गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी वारंवार करूनही ग्रामपंचायत प्रशासन करतेय तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गांधीनगरमध्ये वारंवार होणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले स्थानिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com