गांधीनगर बाजारपेठ उद्या बंद राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर बाजारपेठ
उद्या बंद राहणार
गांधीनगर बाजारपेठ उद्या बंद राहणार

गांधीनगर बाजारपेठ उद्या बंद राहणार

sakal_logo
By

गांधीनगर बाजारपेठ
उद्या बंद राहणार
गांधीनगर : सिंधी समाजाचे कुलदैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २३) विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त गांधीनगर (ता. करवीर) बाजारपेठ बंद राहणार असल्याचे सिंधी सेंट्रल पंचायत आणि विविध सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांच्या बैठकीत ठरले. सिंधी समाजाचे कुलदैवत साई झुलेलाल यांची जयंती चेट्रीचंड या नावाने साजरी केली जाते. याचदिवशी सिंधी समाजाचे नववर्ष सुरू होत आहे. गुरुवारी सकाळी ८ ते १० वाजता बाईक रॅली होणार आहे. त्यानंतर ११ ते १ वाजेपर्यंत साई झुलेलाल अभिषेक होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता लंगर प्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ४ ते ५ वाजता मुख्य सिंधी पूजा बहराणा-साहेब होणार आहे. सायंकाळी सिंधी समाजातर्फे महामिरवणुकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष ग्वालदास कट्यार, उपाध्यक्ष मदनलाल मलानी, सुरेशलाल आहुजा, अशोक टेहल्याणी, दिलीप कुकरेजा, सुनील कोईरिमल, शाम सावलानी, मनोज बचानी, गुड्डू सचदेव, सुनील कारडा, शुलू लालवाणी, सिंधी बांधव उपस्थित होते.