Thur, October 5, 2023

गांधीनगरमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून लाखाची चोरी
गांधीनगरमध्ये बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून लाखाची चोरी
Published on : 12 May 2023, 7:10 am
गांधीनगरमध्ये एक लाखाच्या ऐवजाची चोरी
गांधीनगर, ता. १२: बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने गांधीनगर (ता. करवीर) येथील अक्षय संतोष हिंदुजा (रा. महाआंबे प्लाझा, गांधीनगर) यांच्या फ्लॅटच्या लोखंडी कपाटातील पंधरा हजार रुपये रोख रकमेसह ८० हजार ५०० रुपयांच्या सोळा ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या आणि पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम लंपास केले. हा चोरीचा प्रकार चार मे ते नऊ मे दरम्यान झाला. अक्षय हिंदुजा यांच्या आईचे निधन झाल्याने उत्तरकार्यानंतर त्यांनी आज, शुक्रवारी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.