लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीस गरोदर केले

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीस गरोदर केले

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरूणास अटक
गांधीनगरः लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याबद्दल संशयित सचिन बाळकृष्ण आंब्रे (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. याबाबत संशयित सचिन आंब्रे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबतची माहिती अशी की, सचिन आंब्रे याने ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या दरम्यान एका लॉजवर अल्पवयीन मुलीला नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिली. काल या मुलीने एका मुलीस जन्म दिला असून, लग्नाचे आमिष दाखवून सचिन आंब्रे याने अत्याचार केल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे. याबाबत गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, संशयितास अटक केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद राळेभात करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com