Sun, Sept 24, 2023

बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह वळिवडेतील पंचगंगा नदीपात्रात
बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह वळिवडेतील पंचगंगा नदीपात्रात
Published on : 27 May 2023, 3:13 am
बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह
पंचगंगा नदीत आढळला
गांधीनगरः कोल्हापुरातून बेपत्ता झालेल्या राजू व्यंकाप्पा जोधळे (वय ५८ वर्षे, रा. कावळा नाका, कोल्हापूर) यांचा मृतदेह शनिवारी वळिवडे (ता. करवीर) येथील पंचगंगा नदीच्या पात्रात सुर्वे बंधाऱ्याजवळ आढळून आला. याबाबतची वर्दी पोलिस पाटील दिपक पासाण्णा यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, राजू जोंधळे हे मंगळवारपासून बेपत्ता झाले होते. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा अजय याने शाहूपुरी पोलिसांत दिली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी वळिवडे येथील पंचगंगा नदीपात्रात बंधाऱ्याजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. हा मृतदेह जोंधळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.