
कोल्हापूर : टेक्निक, आहारच यशाचे सुत्र
गडहिंग्लज : ‘‘सध्या खेळांकडे वळणाऱ्यांची संख्या वाढते आहे. क्रीडाक्षेत्राच्या दुष्टीने हे आशादायक आहे. कामगिरी उंचावण्यासाठी तंत्रावर (टेक्निक) भर द्यायला हवा. त्यासाठी खेळाडूंनी बालपणापासूनच टेक्निक, आहार आणि विश्रांती यांचे समीकरण जुळवल्यास निश्चित यश’’ असल्याचे प्रतिपादन उद्योजक प्रकाश मोरे यांनी केले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ट फुटबॉलपटू भैरू चौगुले होते.
एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला. यंदा या शिबिराचे अठरावे वर्ष आहे. संदिप कांबळे यांनी स्वागत केले. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली. आयर्न मॅन स्पर्धेची माहिती सांगताना उद्योजक मोरे म्हणाले, ‘‘धावणे, पोहणे आणि सायकलिंग असा त्रिवेणी संगम असणारा ही स्पर्धा शरिराचा कस पाहणारी असते. सलग १६ तासाहुन अधिक वेळ स्पर्धा असते. त्यात टेक्निक, आहार आणि विश्रांती यांचे महत्व अन्यनसाधारण आहे. त्यामुळे नवोदितांनी सुरवातीपासूनच या बाबींवर लक्ष केंद्रीत करायला हवे.
जेष्ट फुटबॉलपटू चौगूले म्हणाले, ‘‘पुर्वीच्या तुलनेत नवोदितांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अधिक आहेत. तंत्रशुध्द प्रशिक्षणासह सातत्याने सामने खेळण्याची संधीही मिळत आहे. खेळाडूंनी खेळावर निष्ठा, शिस्त, मनापासून मेहनत यांची सांगड घालावी.’’ या वेळी युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, राष्ट्रीय खेळाडू विक्रम पाटील, गौस मकानदार, सुरज तेली, ओमकार जाधव, यासीन नदाफ, अनिकेत कोले, ओमकार सुतार, सौरभ जाधव, ओमकार हरळीकर उपस्थित होते. अभिजित चव्हाण यांनी आभार मानले.
क्रीडा संस्कृती हवी
परदेशात आरोग्याला सर्वाधिक महत्व असल्याने त्याठिकाणी केवळ खेळ हे करियर न राहता प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळेच ते क्रीडाक्षेत्रात आघाडीवर आहेत. तशी क्रीडा संस्कृती आपल्याकडे विकसित करायला हवी असे, मत मोरे यांनी व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02307 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..