ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः
ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः

ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः

sakal_logo
By

19271
गडहिंग्लज : बसवेश्‍वर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले भक्त.

ओम श्री गुरू बसव लिंगाय नमः
बसवेश्‍वर जयंती; दिमाखदार मिरवणूक, महाप्रसादाचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : शहर परिसरासह तालुक्यात महात्मा बसवेश्‍वर जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सजविलेल्या वाहनावरील बसवेश्‍वरांची प्रतिमा, बाल कलाकारांनी साकारलेली ऐतिहासिक पात्रे, बैलजोड्या, महिला आणि युवकांच्या मोठ्या उपस्थितीने मिरवणूक लक्षवेधक ठरली. मिरवणूक मार्गावरील ओम श्री गुरु लिंगाय नमः या गजराने वातावरण भक्तिमय बनले होते. महाप्रसादाचा दोन हजारांहून अधिकांनी लाभ घेतला.
सकाळी महादेव मंदिर येथे बसवेश्‍वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून वचन स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा व वचन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता येथील शिवाजी चौकात निडसोशी येथून आणलेल्या बसव ज्योतीचे स्वागत करून मिरवणुकीची सुरुवात निडसोशी मठाचे श्री. जगद्गुरू शिवलिंगेश्वर महास्वामीजी, नूल मठाचे श्री. गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते झाली. वीरशैव बँक चौकातील महात्मा बसवेश्‍वरांच्या पुतळ्याला गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांनी अभिवादन केले.
मिरवणुकीत १२ व्या शतकातील बसवेश्‍वर महाराजांचा सजीव देखावा गडहिंग्लज कला एकादमीच्या बाल कलाकारांनी साकारला होता. बाजारपेठ, दसरा चौक, मुसळे टिकटी, वीरशैव बँक अशी मिरवणूक फिरली. बसवेश्‍वर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली. पिराजी पेठ येथे अन्नदासोहात (महाप्रसादाची) २००० भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वीरशैव समाज सेवा मंडळ, बसवेश्‍वर जयंती उत्सव समितीने यासाठी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, डॉय घाळी महविद्यालयातही बसवेश्‍वर जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांचे महात्मा बसवेश्‍वर यांच्या कार्यावर व्याख्यान झाले. भडगाव, हलकर्णी, महागाव, कडगाव, नूल येथेही बसवेश्‍वर जयंती साजरी झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02309 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top