यंदा केएसए लिग नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा केएसए लिग नको
यंदा केएसए लिग नको

यंदा केएसए लिग नको

sakal_logo
By

यंदा केएसए लीग नको
---
स्थानिक फुटबॉल संघाचा सूर; नोंदणी प्रात्यक्षिक बैठकीत मांडले मत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : हंगामाच्या समारोपाला केवळ १५ दिवस राहिले आहेत. त्यामुळे स्पर्धा घेण्यास अपुरा वेळ आहे. तसेच विजेत्या, उपविजेत्या संघांना कोल्हापुरात कोणत्याही स्पर्धा खेळण्यास मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, केवळ नोंदणीचा भुर्दंड होणार आहे. त्यामुळेच यंदा कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए) ग्रामीण लीग स्पर्धा नको, असा सूर स्थानिक संघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. एम. आर. हायस्कूल सभागृहात नोंदणी प्रात्यक्षिकासाठी ही बैठक झाली.
‘केएसए’तर्फे गडहिंग्लजच्या संघासाठी लीग स्पर्धा होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे ही स्पर्धा ठप्प होती. यंदा हंगामाच्या नोंदणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी स्थानिक संघाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या वेळी ‘केएसए’चे फुटबॉल समिती सदस्य दीपक घोडके, दीपक राऊत उपस्थित होते. नवज्योत फुटबॉल क्लबचे अध्यक्ष संतोष मांगले म्हणाले, ‘‘स्पर्धेसाठी निवडलेली वेळ पूर्णतः चुकीची आहे. हंगाम संपत असताना नोंदणीचा भुर्दंड कशासाठी? कोल्हापुरात बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळण्यास मिळणार नसतील तर या स्पर्धेला अर्थच नाही.’’
गडहिंग्लज फुटबॉल सिटीचे नबी नदाफ यांनी अपुऱ्या वेळेकडे लक्ष वेधले. स्थानिक संघ कोल्हापुरात बाद पद्धतीच्या स्पर्धा खेळायला मिळाव्यात, या उद्देशानेच लीग खेळतात. ग्रामीण लीगसाठी कोणतेही रोख रकमेचे बक्षीस नाही. कोल्हापुरातील हंगामही या महिन्यात संपणार आहे. साहजिकच गडहिंग्लज लीगमधून पात्र ठरणाऱ्या संघांची मेहनत, आर्थिक गुंतवणूक कुचकामी ठरण्याची भावना प्रतिनिधींनी बोलून दाखवली. ‘युनायटेड’चे संदीप कांबळे यांनी स्थानिक पंचासाठी शिबिराची मागणी केली. काळभैरव क्लबचे शीतल दावणे, मनोहर तारिहाळकर, अभिजित चव्हाण यांनीही मत मांडले.
ऑक्टोबरमध्ये पुन्हा नव्या हंगामासाठी नोंदणी करावी लागेल. त्यामुळे यंदा स्पर्धा नको, असा सूर व्यक्त झाला. या वेळी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. स्पर्धेबाबत सर्व संघांनी लेखी कळवावे, असे ‘केएसए’तर्फे सांगण्यात आले. पंधराहून अधिक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02310 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top