भडगावला वाढतेय स्पोर्ट्स स्पिरिट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भडगावला वाढतेय स्पोर्ट्स स्पिरिट
भडगावला वाढतेय स्पोर्ट्स स्पिरिट

भडगावला वाढतेय स्पोर्ट्स स्पिरिट

sakal_logo
By

भडगावला वाढतेय स्पोर्ट्स स्पिरिट
क्रिकेट पाठोपाठ फुटबॉल स्पर्धा यशस्वी; युवकांच्या ऊर्जेला विधायक वळण
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : शहरालगत असणारे तालुक्यातील सर्वात मोठे गाव भडगाव सध्या क्रीडाक्षेत्रात चर्चेत आले आहे. आएपीएलच्या धर्तीवरील क्रिकेट पाठोपाठ फुटबॉल स्पर्धा दिमाखात यशस्वी करून स्पोर्ट्स स्पिरिटला बळ दिले आहे. स्पर्धांच्या निमित्ताने मैदानाची दुरुस्ती करुन युवकांच्या ऊर्जेला विधायक वळण देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे. खेळाला मिळणारे प्रोत्साहन पाहून सरावासाठी मैदानावर मुलींची संख्याही वाढू लागली आहे.
भडगावची सुमारे पंधरा हजार लोकसंख्या. हिरण्यकेशी नदीकाठावरील गावामुळे सुपीक शेतजमीनीचे वरदान. यामुळे शेती हाच मुख्य व्यवसाय असणाऱ्या राजकियदृष्ट्या संवेदनशील गावात तब्बल दीड डझनाहून अधिक शेतवडीत ग्रामस्थांचा रहिवास. कानडी भाषेचा अधिक वापर. गावालगतचे निसर्गरम्य टेकडीवरील प्राचीन गुड्डादेवीचे मंदिर अलिकडे फिटनेस सेंटर म्हणून नावारूपाला. क्रीडा वर्तूळात नामवंत मॅरेथॉनपटू परशुराम भोईचे गाव हीच केवळ ओळख.
गावाला तसे अधिकृत मैदान नसल्याने क्रीडा विकासाची जणू कोंडीच. पण, पडीक देवस्थानच्या जमीनीला ग्रामस्थांनी श्रमदानातून मैदानाचे स्वरूप दिले. क्रिकेटमध्ये मुख्यतः ३० ते ३५ तर फुटबॉलमध्ये २० ते २५ वयोगटाचे एकुण ३०० युवक १६ संघातून खेळले. फुटबॉल सामने पाहण्यासाठी तर मैदानावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. समाजमाध्यमात विविध व्हिडीओ, छायाचित्रांनाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्याधुनिक ध्वनीयंत्रणा, खेळाडूंचे विविध रंगी पोषाख, सामन्यांचे धावते समालोचनाने जणू गावात क्रीडानगरीचे चित्र होते. या स्पर्धांनी गावातील सर्वच राजकिय पक्ष, गट, तरुण मंडळे, संस्था यांना जणू एकत्र आणले.
------------
चौकट..
सकारत्मकाकडे वाटचाल..
शहरालगत असल्याने गडहिंग्लजमधील युवकांच्या छोट्या मोठ्या हमरीतूमरीत भडगावातील युवकांचा सहभाग वाढला होता. त्यामुळे भडगावच्या युवकांची नकारात्मक ओळख तयार झाली होती. क्रीडा स्पर्धांच्या सहभागाने युवकांनी याला छेद देत हार जीत पचवित शिस्तबध्दपणे जणू सकारत्मकतेकडे वाटचाल सुरु केली आहे.
-----------------
कोट..
क्रीडा स्पर्धामुळे गावातील युवकांत सलोखा वाढला आहे. स्पर्धेमुळे ग्रामपंचायत, लोकवर्गणीच्या मदतीतून मैदानाला चांगले स्वरूप आले. परिणामी, युवक मोबाईलला दुर सारत फावला वेळ मैदानावर सरावासाठी देत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.
- उदय पुजारी, पोलिस पाटील, भडगाव

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02311 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top