सीईटी मुदतवाढीची हॅट्रटीक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईटी  मुदतवाढीची हॅट्रटीक
सीईटी मुदतवाढीची हॅट्रटीक

सीईटी मुदतवाढीची हॅट्रटीक

sakal_logo
By

सीईटी अर्जासाठी मुदतवाढीची हॅट्‌ट्रिक
व्यावसाईक अभ्यासक्रम; बुधवारनंतर पुन्हा संधी मिळणार नाही
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षातर्फे अर्ज प्रक्रिया मार्चमध्ये सुरू झाली. त्यासाठी तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी कक्षाने जाहीर केला आहे. बुधवारी (ता. ११) अखेर विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील. ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर पुन्हा संधी नसल्याचे विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घेण्याचे आवाहन सीईटी कक्षाने परिपत्रकातून केले आहे. आभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कृषी या व्यावसायिकक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही सीईटी होते. वाढीव संधीसाठी विद्यार्थ्यांना पाचशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ प्रवेशासाठी सीईटी होत आहे. दहा मार्चला प्रक्रिया सुरू झाली होती. पहिल्यांदा ३१ मार्चला ही मुदत संपली होती; पण अर्ज भरण्यासाठी सतत अडचणी आल्याने अनेक विद्यार्थी ही प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. त्यासाठी सीईटी सेलने मुदत दुसऱ्यांदा १५ एप्रिलपर्यंत वाढवली होती. विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर हे अर्ज सादर करावयाचे आहेत. वाढीव मुदतीसाठी विद्यार्थ्यांना अधिक पाचशे रुपये द्यावे लागणार असल्याचे सीईटी सेलने परिपत्रकात नमूद केले आहे.
दरवर्षी एप्रिल- मे मध्ये सीईटी होते; पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. साहजिकच निकाल लाबंल्याने प्रवेश प्रक्रियाही रेंगाळल्या होत्या. यंदा वेळेवर सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याने परीक्षाही वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात अर्ज करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्याने हि प्रक्रिया लांबत आहे. सीईटी सेलने पंधरवड्यापूर्वी परीक्षेच्या तारखा नव्याने जाहीर केल्या. राष्ट्रीय आभियांत्रिकी (जेईई), वैद्यकीय (नीट) पदवी प्रवेशाच्या परीक्षा जून- जुलैला आहेत. त्यामुळे राज्यस्तरीय एमएचटी-सीईटी परिक्षा दोन महिने पुढे ढकलल्या. परिणामी, सीईटी नियोजित जूनऐवजी ऑगष्ट मध्ये होणार आहे.

परीक्षांच्या तारखा
अभियांत्रिकी, फार्मसी ः ५ ते २० ऑगस्ट
एमबीए, एमएमएस ः २३ ते २५ ऑगस्ट
एमसीए ः ४-५ ऑगस्ट
बीएचएमसीटी ः २१ ऑगस्ट
एम आर्च, एम एचएमसीटी ः २ ऑगस्ट

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02312 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top