पान ८ ॲंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ८ ॲंकर
पान ८ ॲंकर

पान ८ ॲंकर

sakal_logo
By

20143
निखिल, कैलास प्रशिक्षणाच्या मैदानात
राष्ट्रीय फुटबॉलपटू : व्यावसायिक अनुभवाचा मिळणार नवोदितांना लाभ
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : स्थानिक नामवंत राष्ट्रीय फुटबॉलपटू निखिल कदम, कैलास पाटील यांनी प्रशिक्षणाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून दीड दशक मैदान गाजविल्यानंतर प्रशिक्षकाच्या नव्या भूमिकेत ते दिसणार आहेत. इंडियन सुपर लीग (आएएसएल), इंडियन फुटबॉल लीग(आय लीग) या स्पर्धांतील त्यांचा अनुभव नवोदितांना मिळणार आहे.
पुण्यातील शासनाच्या क्रीडाप्रबोधिनीतून कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या निखिलची पुणे एफसीच्या युवा संघात कामगिरी बहरली. युवा आयलीगमध्ये कर्णधार म्हणून पुणे एफसीला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर डीएसके शिवाजीयन्स, मुंबई एफसीतून खेळला. मुख्यतः भारतीय फुटबॉलची पंढरी कोलकत्याच्या मोहन बागान, मोहामेडन स्पोर्टिंगमध्ये लक्षवेधी खेळ केला. आएएसएलमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून मध्य आणि आक्रमणफळीत छाप पाडली. भारतीय २३ वर्षाखालील संघातही तो निवडला होता. त्याने प्रशिक्षणातील ग्रासरूट, डी लायसन्स पुर्ण केले आहे. निखिल कदम फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून तो प्रशिक्षण देणार आहे. प्रॅक्ट्रीस क्लबमधून कारकिर्दीचा नारळ फोडणारा कैलासने मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल्स अँन्ड फर्टिलासझर्सव्दारे (आरसीएफ) व्यावसायिक पर्दापण केले. धडाकेबाज खेळामुळे बलाढ्य एअर इंडियाने त्याला हेरले. आयलिगमध्ये आघाडीफळीत बहारदार खेळामुळे ओनजीसी संघाने त्याला सामावून घेतले.
संतोष ट्रॉफी या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविले. कोल्हापूर रॉयल्स अकादमीतून तो नवोदितांना मार्गदर्शन करत आहे.

चौकट..
उत्कृष्ट खेळाडू ते प्रशिक्षक
खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भिन्न जवाबदाऱ्या. साहजिकच या दोन्हीं भूमिकेत यशस्वी होणाऱ्यांची संख्या हातावर मोजण्याइतपतच. त्यात प्रभाकर मगदूम, निशिकांत मंडलिक, निवास जाधव, बाजीराव मंडलिक, विश्वास कांबळे, बाबूराव पाटील, शरद माळी यांच्यासह अलिकडे रिची फर्नाडींस, अमित पवार, बंडा वणिरे यांचा उल्लेख करावा लागेल.

कोट..
“आपले खेळाडू टेक्निकमध्ये कमकुवत आहेत. व्यावसाईक फुटबॉल खेळण्यासाठी ते परफेक्ट करण्याचे उदिष्ठ आहे. खासकरून कोल्हापुरी खेळाडू देशभरातील अव्वल संघात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
- निखिल कदम, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02313 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top