पोस्टर प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोस्टर प्रदर्शन
पोस्टर प्रदर्शन

पोस्टर प्रदर्शन

sakal_logo
By

02020

भेंडवडेतील पूरग्रस्तांचे
महसूलमंत्र्यांना निवेदन
खोची ः भेंडवडे येथील पूरग्रस्तांच्या मागणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गायरानातील जागा वर्ग करता येईल का याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेंडवडे येथील पूरग्रस्त बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सदस्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले. यावेळी पूरग्रस्त समितीने व्यथा मांडल्या. या वेळी हर्षवर्धन चव्हाण, अतुल पाटील, आण्णासाहेब पाटील, उत्तम निकम, दीपक माने उपस्थित होते.


''जागृती शिक्षणशास्त्र''मध्ये पोस्टर प्रदर्शन
गडहिंग्लज, ता. ७ : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणविषयक या पोस्टर प्रदर्शनाचे उद्‍घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश घाळी यांच्या हस्ते झाले. द्वितीय वर्षाच्या छात्रशिक्षकांनी पर्यावरण संरक्षण, वसुंधरा संवर्धन, प्रदूषणाचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम, वृक्ष लागवडीची गरज, जंगल वाचवा, पर्यावरण विषयक कायदे आदी विषयांची मांडणी या प्रदर्शनात केली होती. आरती पाटील, मीना डायस, दर्शन मोरे, शंकर पाटील, प्रवीण सावंत, श्रावण सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता. डॉ. घाळी यांनी पर्यावरण संरक्षणाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. राहुल नवले यांनी आभार मानले.

वेतवडेतील ‘केदार्लिंग’मध्ये सत्तांतर
पणुत्रे : वेतवडे (ता. पन्हाळा) येथील केदारलिंग सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत केदार्लिंग शेतकरी विकास आघाडीने १६ जागांवर विजय मिळवत सत्तांतर घडविले. विरोधी चांगभलं केदार्लिंग आघाडीचा धुव्वा उडाला. एक जागा बिनविरोध झाली होती. सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भटक्या विमुक्त प्रवर्गातून धनश्री अनिल सुतार यांची बिनविरोध निवड झाली होती. विजयी आघाडीचे नेतृत्व जयसिंग पाटील, के. डी. पाटील, रघुनाथ पाटील, विलास पाटील यांनी केले. पराभूत आघाडीचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष महादेव बंडू पाटील, दिलीप पाटील, केरबा पाटील यांनी केले. विजयी उमेदवार असे ः जयसिंग पाटील, रघुनाथ पाटील, कृष्णांत पाटील, भिकू पाटील, संजय पाटील, कुंडलिक दळवी, बाबू दळवी, रामचंद्र दळवी, शंकर पाटील, प्रकाश पाटील, विष्णू पाटील, महमद जमादार, रंजना दळवी, विमल पाटील, विष्णू सुतार, विनायक कांबळे.

01615
दर्शना पाटील हिची निवड
मलकापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी येथील ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी दर्शना राजेश पाटील हिची निवड झाली आहे. तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून तिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला प्रा. शिवाप्पा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धा गोगवे येथे झाली. राजेंद्र सूर्यवंशी, आनंदा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट शिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, संस्था सचिव विष्णू पाटील, मुख्याध्यापक ए. पी. पाटील, दीपक लाड, रामशास्त्री तळप आदी उपस्थित होते.

२७२३
२७२४
संभाजी जाधव अध्यक्षपदी
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील आकनूर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संभाजी गोपाळ जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी रंजना लक्ष्मण जाधव यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी वर्षा भोई होत्या. राजू चव्हाण यांनी स्वागत केले. साताप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक धनाजी जाधव, बबन चौगुले, जीवन जाधव, सुरेश पाटील, अशोक पाटील, साताप्‍पा पाटील, मारुती गिरी, सुवर्णा पाटील, रंजना चव्हाण उपस्थित होते. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. किसन रानमाळे यांनी आभार मानले.

01128, 01129
चेचर, उबाळे यांची बिनविरोध निवड
पोर्ले तर्फे ठाणे ः येथील सर्जेराव पाटील (तात्या) हनुमान विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण यशवंत चेचर यांची, तर उपाध्यक्षपदी चिंगूबाई बळवंत उबाळे यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक सह संस्था (पन्हाळा) व्ही. पी. मट्टीमणी अध्यक्षस्थानी होते. सदस्य प्रकाश पाटील, पांडुरंग पाटील, महादेव चौगुले, सरदार पाटील, भीमराव साळोखे, आनंदा शेवाळे, स्वरूप पाटील, हिंदूराव खवरे, प्रकाश पाटील, नारायण काशीद, रामराव चेचर, उमेश जाधव, सुधीर संकपाळ, धनगर, पुष्पा चौगुले उपस्थित होते. सचिव दत्तात्रय चौगुले यांनी आभार मानले.


केदारलिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध
तुरुकवाडी : सोंडोली (ता. शाहूवाडी) येथील श्री केदारलिंग विकास सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेवर आजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, मानसिंगराव गायकवाड गटाने वर्चस्व ठेवले. नूतन कार्यकारिणी- सचिन पाटील, रामचंद्र पाटील, बाळू सावंत, भाऊसो सावंत, पांडुरंग म्होळे, सर्जेराव पाटील, आनंदा पाटील, तानाजी पाटील, आनंदा निवृत्ती पाटील, शंकर ईश्वरा चोपडे, पारुबाई खरुशे व बाळाबाई चोपडे बिनविरोधसाठी शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष भीमराव पाटील, गोरक्ष चोपडे, तुकाराम पाटील, भीमराव पाटील, गोरक्ष पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, आण्णासो पाटील, संपत पाटील आदींनी परिश्रम घेतले.

२७२०, २७२१
‘कपिलेश्वर’च्या अध्यक्षपदी संजय पाटील
सरवडे ः कपिलेश्वर (ता. राधानगरी) कपिलेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर
उपाध्यक्षपदी सूर्याजी लक्ष्मण पाटील यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सागर रानमाळे होते. ४५ वर्षे निवडणूक बिनविरोध होत आहे. सभेस नूतन संचालक भिकाजी पाटील, प्रकाश भोसले, मारुती पाटील, भिवाजी तौंदकर, बबन म्हाळुंगेकर, शिवाजी मनुंगडे, अशोक साळवी, शंकर भोई, भिकाजी कांबळे, सोनाबाई हातकर, नंदिनी पाटील उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, निवडणूक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सचिव अनिल आबदार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02314 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top