
गडहिंग्लज-मुंबई बस फेरी सुरू
गडहिंग्लज-मुंबई बस फेरी सुरू
चाकरमान्यांची होणार व्यवस्था; विनाथांबा कोल्हापूर फेरीला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील आगारातर्फे मुंबई बसफेरीला आजपासून प्रारंभ झाला. लॉकडाउननंतर ही फेरी सुरू झाली. परिणामी, चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे. कोल्हापूर विनाथांबा फेरीही पूर्ववत झाली आहे. या फेरीला उत्तम प्रतिसाद असल्याने तब्बल एकूण ५४ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सोलापूर, पंढरपूर या हंगामी गाड्यांनाही प्रवासी वाढले आहेत.
कोरोनामुळे विस्कळीत झालेली मुंबई फेरीअखेर आजपासून सुरू झाली. सायंकाळी पाच वाजता ही गाडी सुटली. रोज परेलमधून रात्री आठ वाजता ही गाडी परत गडहिंग्लजला येणार आहे. सुटीला मोठ्या संख्येने या परिसरातील चाकरमनी आपापल्या गावी येतात. तसेच मे अखेर ते जून पहिल्या आठवड्यात परतीचा प्रवास सुरू असतो. त्यामुळे चाकरमानी कुटुंबीयांची या फेरीने चांगली सोय होणार आहे. मुंबईला पुरेसे प्रवासी असल्यास ज्यादा फेरी सोडण्याचे नियोजन असल्याचे आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी माहिती दिली.
सुट्यांचा हंगाम लक्षात घेऊन पुणे मार्गावर सकाळी रोज तीन गाड्या सुरू आहेत. सकाळी ७.३०, ८.३०, ९.३० आणि दुपारी एक वाजता या गाड्या आहेत. सोलापूरला देखील दोन फेऱ्या असून सकाळ ७.३० आणि ११ वाजता दुसरी फेरी आहे. पंढरपूरला रोज दुपारी १२ वाजता गाडी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ५६ मुक्कामाच्या फेऱ्याही एसटीचा संप मिटल्यानंतर पूर्वतत झाल्या आहेत. विना थांबा कोल्हापूरला सकाळी सहा वाजलेपासून प्रत्येक अर्ध्या तासाला एक फेरी सुरू आहे.
----------------------
चौकट..
मनमानी भाड्यातून सुटका
मुंबई फेऱ्या बंद असल्याने खासगी ट्रॅव्हल्सचा एकमेव पर्याय होता. त्यामुळे अनेकदा प्रवाशांची गर्दी वाढल्यानंतर मनमानी भरमासाठ भाडे आकारले जायचे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत होती. मुंबई फेरी सुरू झाल्याने या मनमानी भाड्यातून प्रवाशांची सुटका होण्याची आशा आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02316 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..