गडहिंग्लजला २७ पासून शिवराज-युनायटेड लिग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला २७ पासून शिवराज-युनायटेड लिग
गडहिंग्लजला २७ पासून शिवराज-युनायटेड लिग

गडहिंग्लजला २७ पासून शिवराज-युनायटेड लिग

sakal_logo
By

गडहिंग्लजला २७ पासून
शिवराज-युनायटेड लीग
युवा फुटबॉलपटूंना व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे अठरा, सोळा आणि चौदा वर्षांखालील खेळाडूसांठी ‘डेव्हलपमेंट लीग’ होणार आहे. युवा आणि कुमार खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक संधी मिळावी यासाठी शुक्रवार (ता.२७) पासून एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही लीग कम नॉकआऊट पध्दतीने स्पर्धा होईल. शिवराज युनायटेड स्पर्धेसाठी रोख अर्ध्या लाखाची पारितोषिके आहेत.
वरिष्ठ गटातील खेळाडूंना स्पर्धा खेळण्याच्या अनेक संधी आहेत. तुलनेत युवा आणि कुमार खेळाडूंना संधी खुपच कमी आहेत. ही उणीव लक्षात घेऊन खेळाडू घडविण्यासाठी ही डेव्हलपमेंट लीग ही संकल्पना राबवली जात आहे. सामन्यांचा अनुभवच युवा खेळाडूंना परिपक्व बनवू शकतो यासाठी जाणीवपूर्वक ही स्पर्धा होत आहे. गडहिंग्लजसह लगतच्या ग्रामीण भागातून खेळाडू यासाठी निवडून त्यांचे आठ संघ होतील. निवडलेल्या खेळाडूंना जागतिक फुटबॉलमध्ये दबदबा असणाऱ्या ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, इंग्लंड, इटली, हॉलंड यासह भारतीय संघाचे किट देण्यात येईल.
आठ संघांची प्रत्येकी चार याप्रमाणे दोन गटांत विभागणी करून लीग सामने होतील. गुणानुक्रमे अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी अंतिम सामना होईल. या संधीचा फुटबॉलपटूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, उपाध्यक्ष आनंद पाटील, शिवराज विद्या संकुलाचे प्रमुख प्रा. किसनराव कुराडे, सचिव प्रा. डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे. लीग समन्वयक महेश सुतार, ओंकार सुतार आणि सहकारी नियोजन करीत आहेत.

चौकट..
गुरूवार पासून निवड चाचणी
स्पर्धेतील खेळाडू निवडण्यासाठी गुरुवारपासून (ता. १९) निवड चाचणी होणार आहे. यात अठरा, सोळा आणि चौदा वर्षांखालील फुटबॉलपटू सहभागी होऊ शकतील. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सकाळी ६.१५ ते ८.१५ पर्यंत चार दिवस ही निवड चाचणी होईल.
-----------------------------------
दीपक कुपन्नावर, गडहिंग्लज.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02318 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top