एसटीच्या वर्धापनदिनी पेढे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या वर्धापनदिनी पेढे वाटप
एसटीच्या वर्धापनदिनी पेढे वाटप

एसटीच्या वर्धापनदिनी पेढे वाटप

sakal_logo
By

26028
गडहिंग्लज ः एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना संजय चव्हाण. व्यासपीठावर राम सावंत आदी.

एसटीच्या वर्धापन दिनी विविध उपक्रम
गडहिंग्लज, ता. २ : येथील आगारात एसटीचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. वर्धापन दिनानिमित्त आगार आणि बसस्थानकात विशेष स्वच्छता करून रांगोळी आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आगारातील सर्व गाड्यांचीही धुलाई करण्यात आली. विठ्ठल कुरणे यांनी स्वागत केले. आगार व्यवस्थापक संजय चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राम सावंत यांनी मार्गदर्शन केले. प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. प्रवाशांना साखरपेढे वाटप करण्यात आले. या वेळी स्थानक प्रमुख राजेश मातले, कार्यशाळाप्रमुख विजय शिंदे, अनिल पाटील यांच्यासह वाहक, चालक कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02326 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top