बॅ नाथ पै विद्यालय होणार ‘ग्लोबल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅ नाथ पै विद्यालय होणार ‘ग्लोबल’
बॅ नाथ पै विद्यालय होणार ‘ग्लोबल’

बॅ नाथ पै विद्यालय होणार ‘ग्लोबल’

sakal_logo
By

26600
गडहिंग्लज : बॅ नाथ पै विद्यालयाची इमारत.

बॅ नाथ पै विद्यालय होणार ‘ग्लोबल’
हेरिटेज प्रशाला; होप फाउंडेशनचा आराखडा, पालिका, माजी विद्यार्थ्यांची मदत
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : या उपविभागातील सर्वात जुनी शाळा असणाऱ्या येथील बॅ नाथ पै विद्यालयाला (स्थापना १८४९) ‘ग्लोबल’ बनविण्याचा निर्णय झाला आहे. स्थानिक होप फाउंडेशनने यासाठी आराखडा केला आहे. पालिका, माजी विद्यार्थी, पालक संघाच्या मदतीने अद्यावत सुविधांसह या हेरिटेज प्रशालेला पूर्वीचे रंगरुप देण्याचे नियोजन आहे. यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका झाल्या आहेत. अल्पावधीत दिडशेहुन अधिक जुन्या माजी विद्यार्थ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या या शाळेला गतवैभव मिळणार आहे.
या विभागात शिक्षणाचा श्रीगणेशा या प्रशालेमुळे दीड शतकापूर्वी झाला. सुरुवातीला पाचवीपर्यंयत या प्रशालेत शिक्षणाची सोय होती. त्यानंतर पाच दशकाने सातवीपर्यंत सोय झाली. या विभागातील एकमेव सरकारी शाळेमुळे परिसरातील चार तालुक्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे. मराठा बोर्डिंग, वीरशैव बोर्डिंगमध्ये या विद्यार्थ्यांची राहण्या जेवणाची सोय स्थानिक दानशुरांच्या मदतीतून केली जायची. जिल्हा परिषदेकडून १९७८ मध्ये ही शाळा पालिकेकडे वर्ग करण्यात आली. दोन वर्षांनी शाळेचा शतकोत्तर अमृतमहोत्सव होणार आहे.
जुन्या पद्धतीचे दगडी बांधकाम, कौलारू छप्पर असेच शाळेचे आजही स्वरुप आहे. इंग्रजी सी आकारासारखी शाळेची मुख्य इमारत आहे. प्रशालेसमोर सन १९४२ ला उभालेला झेंडा कट्टा आहे. शाळेत महात्मा गांधींचा अर्धपुतळा असून तो जीर्ण झाल्याने दशकापूर्वी साधना कला महविद्यालयाने तो नवा बसविला. सर्वत्र सरकारी शाळा ओस पडत असताना या शाळेने स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पंरपंरा जपल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा महोत्सव, शिष्यवृत्ती वैयक्तिक मार्गदर्शन, उत्कृष्ट विद्यार्थी, विद्यार्थीनी, माता पालकांना पुरस्कार अशा उपक्रमामुळे खासगी शाळांच्या स्पर्धेत नाथ पै स्कूलची आजही वेगळी ओळख आहे.

चौकट...
हे होणार...
- शैक्षणिक सुविधा - गुरुकुल पद्धत, आर्युवेर्दिक, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
- पायाभूत सुविधा, हेरिटेज इमारतीला पूर्वीचा लूक
- हॉबी सभागृह
- गायन, नाट्य, वादनासह इतर कलांचे शिक्षण
- सीबीएसईसह परदेशातील शाळांशी कराराद्वारे व्यवहार ज्ञानावर भर
- मध्यवर्ती ठिकाणामुळे शेती विषयासह प्रेक्षणीय स्थळ म्हणून शाळेचा विकास

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02327 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top