केएसए फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएसए फुटबॉल
केएसए फुटबॉल

केएसए फुटबॉल

sakal_logo
By

भडगावने फोडला केबीआरला घाम
केएसए गडहिंग्लज लिग : जय गणेशचा दुसरा पराभव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन मार्फत सुरु असलेल्या गडहिंग्लज फुटबॉल लिग मध्ये आज नवोदित भडगाव क्लबने चिवट खेळ करून माजी विजेत्या काळभैरी रोड फुटबॉल क्लबला (केबीआर) घाम फोडला. पिछाडीवर असणाऱ्या केबीआऱला १-१ अशा बरोबरीसाठी जादा वेळेपर्यंत झुंजावे लागले. अनुभवी मास्टर स्पोर्ट्सने दमदार वाटचाल करत जय गणेश एफसीला दोन गोलनी हरवले. सॉकर ट्रेनिंग सेंटर विरूध्द केबीआर ब सामना १-१ असा बरोबरीत सुटला. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावरील या स्पर्धेत सात संघ सहभागी आहेत.
यंदा स्पर्धेत प्रथमच उतरलेला भडगाव प्राथमिक दोन सामने मोठ्या गोलफरकाने पराभूत झाला होता. साहजिकच केबीआर विरूध्द भडगाव किती गोलफरकाने पराभूत होणार याचीच औपचारिकता होती. प्रत्यक्षात भडगावने चिवट खेळ करून पूर्वार्धात गोलफरक कोरा ठेवला. उत्तरार्धातही हाच पवित्रा कायम ठेवत गोल करण्यासाठी पुढे आलेल्या बचावफळीचा फायदा उठवत भडगावच्या रवि चोथने धक्कादायक गोल केला. ज्यादा वेळेत केबीआरच्या तानाजी शिंदेने गोल करून संघाला पराभवापासून तारले. भडगावच्या महेश राजगोळे, अर्थव कुंभार, अर्थव सावेकर, भुषण जाधव, देवराज धनवडे यांनी चिवट खेळ केला.
मास्टर स्पोर्टसने घौडदौड कायम ठेवत जय गणेश एफसीचा दोन गोलनी सहज पाडाव केला. जय गणेशचा हा सलग दुसरा पराभव होय. मास्टरच्या केदार डांग, साकिब मणियार यांनी प्रत्येकी एक गोल केला. केबीआर ब विरूध्द सॉकर ट्रेनिंग सेंटर हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. केबीआरच्या बचा हेमंत रोटे तर सॉकरचा वैभव पाटीलने गोल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02329 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top