एस टी कर्मचाऱ्यांत असंतोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस टी कर्मचाऱ्यांत असंतोष
एस टी कर्मचाऱ्यांत असंतोष

एस टी कर्मचाऱ्यांत असंतोष

sakal_logo
By

वेतनात कपातीने कर्मचाऱ्यांत असंतोष
एसटी बँकेचा दणका; सहा महिन्यांनंतरच्या वेतनात ८० टक्के वसुलीचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : संपात असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा तब्बल सहा महिन्यांनी पगार झाला; पण पगारात एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेने भरमसाट कपातीचा दणका दिल्याने राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. सरासरी ८० टक्के कपात केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मुळात गेले काही महिने आर्थिक ओढाताणीत असताना आधार ठरणाऱ्या पहिल्याच वेतनातील मोठ्या कपातीने कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. अधिक कपातीने वाढत्या महागाईत संसाराचा गाडा कसा ओढायचा असा प्रश्न आहे.
दोन वर्षांपासून कोरोना आणि नंतर संप यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिकचक्रच विस्कळीत झाले आहे. रखडलेल्या वेतनामुळे हात उसने करायचे तरी किती अशी चिंता सतावत आहे. पै पाहुणे, मित्र, शिल्लक पुंजी यांच्या मदतीने त्यांनी या बिकट परिस्थितीला चिकाटीने सामोरे गेले. साहजिकच संप मिटल्यानंतरच्या वेतनातून या चक्रव्यूहातून सुटका होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात वेतन जमा झाले त्यावेळी कपात पाहून डोळे चक्रावले. क्षणार्धात आर्थिक नियोजनाना डोलारा भुईसपाट झाला.
थकबाकीमुळे बँकेंची कपात वाढेल अशी कुणकुण होतीच; पण ती इतकी अधिक असेल अशी कल्पना नव्हती. सध्या कर्मचाऱ्यांची नाजूक स्थिती लक्षात घेता इतर काहीं बँकांनी थकीत कपातीसाठी अधिक हप्ते करून सवलती दिल्या. त्याच धर्तीवर कर्मचाऱ्याचीं हक्काची समजली जाणाऱ्या एसटी बँकेंने धोरण करून प्रतिकुल भार हलका होण्यास मदत करावी अशीच कर्मचाऱ्यांची भावना आहे.

कोट
शासन कर्मचाऱ्यांना वेतनातील फरक देताना ४८ हप्यात देत आहे. मात्र, घेताना बँकेंने एकदमच मोठी कपात करणे अन्यायकारक आहे. हप्ते जरी ठप्प असले तरी माणसुकीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने कपात करायला हवी होती.
- अमोल तांबेकर, शशिकांत सुतार, कर्मचारी, गडहिंग्लज आगार

कर्मचाऱ्यांची गेल्या पाच महिन्यांची थकबाकी होती. कर्मचाऱ्याला किमान एक चतुर्थांश वेतन कपात वगळून मिळावे असा नियम आहे. त्या नियमानुसारच बँकेने कर्मचाऱ्यांवर व्याजाचा भुर्दंड वाढू नये यासाठी नियमित कपात केली आहे.
- वसंत पाटील, जिल्हा प्रतिनिधी, एसटी बँक

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02332 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top