‘एमआर’ला सेमी इंग्लीशचा बुस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमआर’ला सेमी इंग्लीशचा बुस्टर
‘एमआर’ला सेमी इंग्लीशचा बुस्टर

‘एमआर’ला सेमी इंग्लीशचा बुस्टर

sakal_logo
By

‘एमआर’ला सेमी इंग्‍लिशचा बूस्टर
शतकमहोत्सवी प्रशाला; माजी विद्यार्थी, पालकांतून स्वागत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : येथील जिल्हा परिषदेच्या महाराणी राधाबाई हायस्कूलमध्ये (एम. आर.) यंदाच्या शैक्षणिक वर्षात सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. बऱ्याच वर्षापासून मागणी असणाऱ्या या निर्णयाचे माजी विद्यार्थी, पालकांतून स्वागत होत आहे. जिल्हा परिषदेची शाळा असूनही दर्जेदार शिक्षणासाठी ही प्रशाला ओळखली जाते. या अभ्यासक्रमामुळे या हेरिटेज शतकमहोत्सवी शाळेला ‘अच्छे दिन’ दिन येतील अशी आशा आहे.
‘एमआर’ हायस्कूल ही केवळ तालुक्यातीलच नव्हे, तर गडहिंग्लज उपविभागातील सर्वात जुनी शाळा होय. सन १९२३ पासून प्रशालेने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडत आहेत. मात्र, या शाळेने गुणवत्ता टिकवित दहावी, बारावीचा शंभर टक्के निकालाची उत्कृष्‍ट पंरपरा कायम ठेवली. क्रीडाक्षेत्रातही शेकडो खेळाडू घडविणाऱ्या या प्रशालेला नजरेत भरणारे मैदान आणि इमारत लाभली आहे. या शाळेचे हजारो माजी विद्यार्थी देश, विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत.
ही गौरवशाली परंपरा असताना अलीकडे खासगी शाळांच्या तुनलेत भौतिक सुविधांची प्रशालेत वाणवा झाली. त्याचा परिणाम हायस्कूलची पटसंख्या घसरण्यावर झाला. साहजिकच शतकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर पटसंख्यावाढीचे आव्हान आहे. या पार्श्‍वभूमीवर सेमी इंग्‍लिशचा निर्णय बूस्टर ठरणार आहे. सेमी इंग्लिशसाठी प्रशालेतील एम. के. माळी, मनीषा खैरे यांच्यासह चेतना भिऊंगडे, वेदिका मोटे या शिक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे प्रभारी प्राचार्य संजय कुंभार यांनी सांगितले.


चौकट..
अकरावीचा प्रवेश सोपा
‘एमआर’ला अकरावी विज्ञान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या दरवर्षी रांगा लागतात. खुला ९५ तर राखीव गटाचा ९० टक्क्यांना प्रवेश बंद होतो. एमआर प्रशालेत दहावी पास झालेल्यांना अकरावीसाठी तब्बल २४ जागां राखीव आहेत. त्यामुळे ‘एमआर’च्या माध्यमिकला प्रेवशाने विद्यार्थ्यांचा अकरावीचा प्रवेश सोपा होणार आहे.
-----------------------------------------
श्री. दीपक कुपन्नावर

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02337 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top