प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ
प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ

sakal_logo
By

पाँलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ
तंत्रशिक्षण संचालनालय : गुरुवार अखेर मुदत, १२ जुलैला गुणवत्ता यादी
सकाळ वृत्तसेवा
ग़डहिंग्लज, ता. १ : तंत्रशिक्षण संचालनालय़ातर्फे पदविका आभियांत्रिकी (पाँलिटेक्निक) अभ्यासक्रमाची प्रथम वर्ष प्रवेशप्रकिया सुरु आहे. विद्यार्थ्यांना आँनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आठवड्याने वाढविण्यात आली आहे. प्रवेश अर्ज गुरुवार (ता. ७) अखेर भऱण्याची मुदत आहे. कच्ची गुणवत्ता यादी ९ तर पक्की १२ जूलैला जाहीर होणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दहावीचा निकाला आधीच हि प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनां आँनलाईन पध्दतीने http://poly22.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करावयाचे आहेत. खुल्या गटासाठी ४०० तर राखीव प्रवर्गाला ३०० रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. राज्यातील सर्व शासकिय, अनुदाऩित आणि खासगी पाँलिटेक्नीक या प्रक्रियेसाठी अर्ज सुविधा केंद्र आहेत. सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्याठिकाणी मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी आपली मुळ प्रमाणत्रे याच कालावधीत पडताळणी करुन घ्यावयाची आहेत.
विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. ४) मुळ गुणपत्रके आपपल्या शाळेत मिळणार आहेत. त्याचवेळी शाळा सोडल्याचा दाखला देखील मिळेल. त्यामुळेच काल (ता. ३०) अखेर असणारी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. प्रवेशाची कच्ची गुणवत्ता यादी ९ जुलैला लागेल. त्यावर ११ जुलै अखेर हरकती घेता येतील. १२ जुलैला पक्की यादी लागेल. त्यानंतर पसंतीक्रम भरण्याच्या फेऱ्या होणार आहेत. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संकेतस्थळाशी संर्पकात राहण्याचे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाने केले आहे.

चौकट...
चार हजार अर्ज निश्चित
यंदा पॉलिटेक्निक प्रवेशाला दरवर्षीच्या तुलनेत अधिक प्रतिसाद दिसतो आहे. दहावीचा निकाल वाढल्याचा हा परिणाम आहे. सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात २० संस्थातून सुमारे ६५०० प्रवेश क्षमता आहे. सोमवारी गुणपत्रके मिळाल्यावर प्रवेश वाढण्याची अपेक्षा आहे.
-----------------------------------------
श्री.दीपक कुपन्नावर.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02344 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..