
युनायटेडतर्फे ७० फुटबॉलपटूंचा गडहिंग्लजमध्ये उद्या होणार गौरव
32914
परेश शिवलकर
युनायटेडतर्फे ७० फुटबॉलपटूंचा
गडहिंग्लजमध्ये उद्या होणार गौरव
आंतरराष्ट्रीय खेळाडू परेश शिवरलकरांची उपस्थिती
गडहिंग्लज, ता. १ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे या गत हंगामातील यशस्वी फुटबॉलपटूंचा गौरव होणार आहे. उद्या रविवारी (ता. ३) दुपारी ३.३० वाजता एमआर हायस्कूलच्या मैदानावर वरिष्ठ, १४, १६ आणि १८ वर्षांखालील ७० खेळाडूंचा सत्कार होईल. माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू परेश शिवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (मुंबई) उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्याच्या शिवलकर यांनी भारतीय संघातून अशियाई पात्रता स्पर्धा खेळली. भारतीय फुटबॉल मधील सर्वोच्च स्पर्धा मानल्या इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) मध्ये महिंद्रा युनायटेड, एअर इंडिया, मुंबई एफसी (मुंबई), चर्चिल ब्रदर्स (गोवा), पुणे एफसी तसेच संतोष ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून बहारदार कामगिरी केली. खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर ते सध्या प्रशिक्षकाचा ब लायसन्स पूर्ण करून रिलायन्स चँम्पचे मुख्य निवडकर्ते, खेलो इंडिया संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, क्रीडाप्रबोधिनीचे प्रशिक्षक धीरज मिश्रा हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी खेळाडू, शौकिनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष आनंद पाटील यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02345 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..