मुंबईत पर्दापणातच नेव्हीविरूध्द गोल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पर्दापणातच नेव्हीविरूध्द गोल!
मुंबईत पर्दापणातच नेव्हीविरूध्द गोल!

मुंबईत पर्दापणातच नेव्हीविरूध्द गोल!

sakal_logo
By

34253
किशोर खेडकर

आठवण खेडकरांच्या ‘त्या’ गोलची!
३४ वर्ष पुर्ण; मुंबईत पर्दापणातच नेव्हीविरूध्द लढत
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. ६ : स्थानिक संघाचा मोह सोडून धाडसानेच मुंबई गाठली होती. राष्ट्रीय केमीकल्स अँन्ड फर्टिलायजर्स (आरसीएफ) संघाने पहिल्याच सामन्यात पर्दापणाची संधी दिली होती. त्यातच आरसीएफ संघ शेवटच्या टप्प्यात अनपेक्षितपणे एका गोलने पिछाडीवर पडला. जिद्दीने झूंजार खेळ करत सामना संपण्यास केवळ दहा मिनिटे शिल्लक असताना बरोबरीचा गोल करत संघाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले. या घटनेला आज (ता. ६) चौतीस वर्षे झाली. मुंबईत ‘कोल्हापूरी टफ डिफेंडर’ म्हणून नावलौकीक मिळविलेल्या किशोर खेडकर यांची ही थरारक कहाणी.
अँथलेटिक्स, क्रिकेट खेळाडू म्हणून परिचित असणारे उंचेपुरे किशोर खेडकर उशिरा फुटबॉल कडे वळले. अकरावीला तत्कालीन स्टार खेळाडू शरद पोवार यांच्यामुळे फुटबॉलचा श्रीगणेशा केला. नैसर्गिक फिटनेसमुळे अल्पावधीत त्यांनी चपळ बचावपटू म्हणून ओळख निर्माण केली. अव्वल प्रॅक्टिस क्लबमुळे अनुभवाची शिदोरी वाढली. माजी खेळाडू शिवाजी पाटलांनी टँलेन्ट ओळखून किशोर खेडकरांना आरसीएफ ट्रायलसाठी मुंबईला नेले.
बचावफळीतील ‘टफ’ खेळामुळे नावारूपाला आलेले किशोर खेडकरनी कोल्हापूरातील डझनाहून अधिक खेळाडूंना मुंबईत खेळण्याची संधी मिळवून दिली. यात कैलास पाटील, शकिल पटेल, सागर चिले यासारख्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. कोल्हापुरी टँलेन्टला आजही मुंबईत मागणी असल्याचे ते सागंतात. स्थानिक खेळाडू बाहेर पडल्यावरच कोल्हापूरी टँलेंन्ट सर्वदुर पोहचु शकेल असे ते नमुद करतात.

चौकट....
कारकिर्द
प्रँक्ट्रिस क्लब- १९८२-१९८८९ (सहा वर्षे)
आरसीएफ- १९८८-२००५ (अठरा वर्षे)
आंतरजिल्हा स्पर्धा – मुंबईकडून २ विजेतेपद
संतोष ट्रॉफी- मुंबईतर्फे १९९३.

कोट..
मातब्बर नेव्हीच्या तगड्या खेळाडूंमुळे गतविजेता असुनही आरसीएफला हंगामाच्या पहिल्या सामन्यात चाचपडावे लागले. पहिल्या सामन्याचे दडपण झूगारून पर्दापणाची सुवर्णसंधी दवडायची नाही या इर्ष्येने केलेला बरोबरीचा गोल लाखमोलाचा समाधान देणारा आहे.
- किशोर खेडकर, माजी राष्ट्रिय फुटबॉलपटू, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02348 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top