आयटीआयतर्फे प्रवेश जागृती अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयतर्फे प्रवेश जागृती अभियान
आयटीआयतर्फे प्रवेश जागृती अभियान

आयटीआयतर्फे प्रवेश जागृती अभियान

sakal_logo
By

34340
गडहिंग्लज : शासकीय आयटीआयतर्फे खास वाहन घेऊन प्रवेश जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे.

‘आयटीआय’तर्फे
प्रवेश जागृती अभियान
गडहिंग्लज, ता. ८ : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांतील (आयटीआय) कोर्सेस आणि प्रवेश प्रक्रिया याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. प्रवेश जागृती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शाळेत जाऊन याबद्दल माहिती दिली जात आहे. या माध्यमातून माध्यमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती मिळत आहे. येथील शासकीय आयटीआयतर्फे सुमारे ५० हून अधिक शाळांत या अभियानांतर्गत माहिती दिली गेली आहे.
दहावीनंतर नोकरीसाठी जवळचा मार्ग म्हणून आयटीआयला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती राहिली आहे. प्रत्येक तालुक्यात शासकीय आयटीआय आहे. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय ऑनलाइन पध्दतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्याची माहिती विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरच व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्याची सूचना व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाने केली असल्याचे प्राचार्य महेश आवटे यांनी सांगितले.
शाळांत जाऊन ‘आयटीआय’नंतर असणाऱ्या नोकरीची संधीची माहिती दिली जात आहे. येथील ‘आयटीआय’मध्ये असणारे कोर्सेस त्यांचा कालावधी, शुल्क याबद्दल विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले जात आहे. हलकर्णी, महागाव या परिसरातील शाळांना भेटी पूर्ण झाल्या आहेत. अजून महिनाभर हे अभियान सुरू राहणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नोव्हेंबरपासून पुन्हा हे अभियान सुरू केले जाणार आहे. पाच शिक्षकांचा गट यासाठी कार्यरत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02349 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top