नवोदितांच्या कामगिरीची उत्कंठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवोदितांच्या कामगिरीची उत्कंठा
नवोदितांच्या कामगिरीची उत्कंठा

नवोदितांच्या कामगिरीची उत्कंठा

sakal_logo
By

नवोदितांच्या कामगिरीची उत्कंठा
नवा फुटबाँल हंगाम; दोन वर्षाच्या खंडानंतर शालेय संघ मैदानावर
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ : कोल्हापुरात सुब्रतो मुखर्जी स्पर्धेने यंदाच्या शालेय फुटबॉल हंगामाचा नारळ फुटला आहे. यात स्थानिक संघ कशी कामगिरी करणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर शालेय संघ मैदानावर उतरत आहेत. त्यामुळे नवोदित खेळाडूंचा कस लागणार आहे. पन्हाळा, कुडित्रे, वारणा येथील निवासी शाळांचे आव्हान गडहिंग्लजकरांना पेलणार का? याची उत्सुकता आहे.
गेल्या दशकभरात गडहिंग्लजच्या फुटबॉलचे चित्र पालटून गेले आहे. खासकरून नवोदित खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पुर्वी एखाद- दुसरा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होत होता. पण, गेल्या दोन दशकापासून सुरु असणाऱ्या डॉ. घाळी शालेय लिग स्पर्धेने जणू नवोदितांत फुटबॉल खऱ्या अर्थाने रुजवला. आता दरवर्षी अर्ध्या डझनाहून अधिक शालेय संघ जिल्हास्तरीय, तर डझनाहून अधिक संघ स्थानिक स्पर्धात सहभागी होतात.
ऐंशीच्या दशकात येथील एमआर हायस्कुलचा शालेय स्पर्धेत दबदबा होता. कोल्हापुरातील नामवंत संघाना नमविण्याचा पराक्रम करत ‘एमआर’ने अनेक विजेतेपद पटकाविले. नव्वदच्या दशकात साधना हायस्कूलने कोल्हापूरच्या छत्रपती विद्यालयाला हरवून राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली होती. तीन वर्षांपूर्वी गडहिंग्लज हायस्कूलने जिल्हास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावून विभागीय स्पर्धेत मजल मारली. कोरोनामुळे दोन वर्षे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्याचा परिणाम सरावावर झाल्याने कस लागणार आहे.
------------
चौकट
निवासी शाळांचे आव्हान
कुडित्रे, पन्हाळा, कोडोली, पेठवडगाव अशा अनेक निवासी शाळांनी खास फुटबॉलसाठी प्रशिक्षक नेमून नियमित सरावाने संघ अधिक बलवान बनविले. तुलनेत येथील संघाची मदार सर्वच खेळांची जवाबदारी असणाऱ्या क्रीडा शिक्षकावरच आहे. त्यामुळे नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर धडपडणाऱ्या खेळाडूंवरच संघाची खरी भिस्त आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02363 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..