
साऊथ युनायटेडच्या तांत्रिक संचालकपदी अंजू तुरंबेकर
72890
अंजू तुरंबेकर
साऊथ युनायटेडच्या तांत्रिक
संचालकपदी अंजू तुरंबेकर
गडहिंग्लज, ता. २९ : बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांची बंगळुरच्या साऊथ युनायटेड संघाची सूत्रे आज हाती घेतली. साऊथ युनायटेड संघाच्या तांत्रिक संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. या संघाच्या तेरा, पंधरा, अठरा आणि वरिष्ठ गटातील संघाच्या प्रशिक्षकांना अंजू मार्गदर्शन करतील. त्या, गेली तीन वर्षे गोव्याच्या डेम्पो अकादमीच्या तांत्रिक संचालक म्हणून काम पाहत होत्या.
अंजू या एएफसी अ लायन्सधारक प्रशिक्षक आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरुट समितीवर सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रासरुट विभागाच्या प्रमुख म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ काम पाहताना देशभरातील पाच हजारांहून अधिक प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. साऊथ युनायटेड हा बंगळूरमधील नामांकीत फुटबॉल क्लब आहे. क्लबचे बंगळूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त स्टेडियम आहे. तेरा, पंधरा, अठरा वर्षाखालील संघ यूथ आयलीगमध्ये खेळतात. क्लबचे प्रमुख शारन पारीख यांनी क्लबची जर्सी देऊन अंजू यांचे स्वागत केले.
Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02365 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..