अंजू तुरंबेकर बंगळुरच्या साऊथ युनायटेडची संचालक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंजू तुरंबेकर बंगळुरच्या साऊथ युनायटेडची संचालक
अंजू तुरंबेकर बंगळुरच्या साऊथ युनायटेडची संचालक

अंजू तुरंबेकर बंगळुरच्या साऊथ युनायटेडची संचालक

sakal_logo
By

39129
बंगळुरू : साऊथ युनाटेड तांत्रिक संचालकाची जवाबदारी शारन पारिख यांच्याकडून स्विकारताना अंजू तुरंबेकर.

अंजू तुरंबेकर बंगळुरच्या
साऊथ युनायटेडची संचालक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २८ : बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांची बंगळुरच्या साऊथ युनायटेड संघाची सुत्रे आज हाती घेतली. साऊथ युनायटेड संघाची टेक्निकल डायरेक्टर (तांत्रिक संचालक) म्हणून तिने जवाबदारी स्विकारली आहे. या संघाच्या तेरा, पंधरा, अठरा आणि वरीष्ठ गटातील संघाच्या प्रशिक्षकांना अंजू मार्गदर्शन करणार आहे. गेली तीन वर्षे अंजू गोव्याच्या डेम्पो अकादमीची तांत्रिक संचालक म्हणून काम पाहत होती.
अंजू तुरंबेकर एएफसी अ लायन्सधारक प्रशिक्षक आहे. अशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरुट समितीवर सदस्य म्हणूनही तिने काम केले आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रासरुट विभागाची प्रमुख म्हणून तिने पाच वर्षाहून अधिक काळ काम पाहिले आहे. देशभरातील पाच हजारांहून अधिक ग्रासरुट प्रशिक्षकांना तिने मार्गदर्शन केले आहे. ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असतानाही अंजूचा बेकनाळ ते एएफसी अ लायन्स हा प्रवास कौतुकास्पद आहे.
साऊथ युनायटेड ही बंगळूरमधील नामांकीत फुटबॉल क्लब आहे. दहा वर्षापुर्वी सुरू झालेल्या या संघाने द्वितीय श्रेणी आय लिग स्पर्धेत सहभाग घेतला आहे. क्लबचे बंगळूरमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयींनीयुक्त स्टेडियम आहे. तेरा, पंधरा, अठरा वर्षाखालील संघ युथ आयलिगमध्ये खेळतात. बंगळुर प्रथम श्रेणी गटात वरीष्ठ संघ खेळतो. क्लबचे प्रमुख शारन पारीख यांनी क्लबची जर्सी देऊन अंजूचे स्वागत केले. गोव्यानंतर बंगळुर फुटबॉलचे आव्हान यशस्वी पेलू असा विश्‍वास अंजूने निवडीनंतर व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02365 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..