पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया
पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया

पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रिया

sakal_logo
By

पॉलिटेक्निक प्रवेश हाऊसफुल्ल होणार
प्रवेशप्रक्रिया : विद्यार्थ्यांचे अर्ज यंदा दुपट्टीने वाढले, गुरुवार अखेर मुदत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : पॉलिटेक्निक प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांची पसंती वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीने प्रवेश अर्जांची संख्या वाढली आहे. परिणामी, यावर्षी पॉलिटेक्निक प्रवेश हाऊसफुल्ल होण्याचे संकेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ७ हजार ९८२ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. गतवर्षी साडेतीन हजार अर्ज आले होते. यावर्षी राज्यात एकुण सुमारे १ लाख १० हजार अर्ज निश्चित झाले आहेत. गुरुवार (ता. ४) अखेर अर्जासाठी मुदत आहे.
दहावी नंतर नोकरीचा शॉटकट म्हणूनच पॉलिटेक्निक कडे पाहिले जाते. खासकरून अभियांत्रिकीतील पाय़ाभुत कोर्सेस म्हणून ओळखले जाणारे इलेक्ट्रीकल, मँकेनिकल आणि सिव्हील या अभ्यासक्रमाना नेहमीच मागणी राहीली आहे. दीड दशकापुर्वी तर व्यवस्थापन अंतर्गत प्रवेशाचा एक लाखाहून अधिक दर होता. या पाशर्वभूमिवर गेल्या दशकभरात राज्यात नवी खासगी तंत्रनिकेतने वाढल्याने प्रवेशाला ओहोटी लागली होती.
यंदाची दोन जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. चार ऑगष्ट अखेर प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर विकल्प भरण्याच्या फेऱ्या होणार आहेत. राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात १२७५७, नाशिक ८६६५, कोल्हापूर ७९८२, अहमदनगर ७४८०, ठाणे ७३३८ प्रवेश अर्ज आलेले आहेत. सहा ऑगष्टला कच्ची तर नऊला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. प्रवेश अर्ज वाढल्याने मेरिट वाढणार हे नक्की आहे.


पॉलिटेक्निक करून पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याकडे कल वाढला आहे. तसेच पॉलिटेक्निक नंतर नोकऱ्याची संख्याही वाढली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणूनच प्रवेश अर्ज वाढले आहेत.
- जयंत घेवडे,
प्राचार्य, आयसीआऱई, गारगोटी.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवेशाला उस्फुर्त प्रतिसाद आहे. प्रवेशातील चढाओढ लक्षात घेऊन पालकांचा प्रवेशाच्या निश्चितीसाठी तगादा लावला आहे. कॉम्प्युटरसाठी अधिक आग्रह आहे.’’
- डॉ. संजय चव्हाण, प्रमुख, एसजीएम पॉलिटेक्निक, महागाव.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02366 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..