आयटीआयची पहिली यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयटीआयची पहिली यादी जाहीर
आयटीआयची पहिली यादी जाहीर

आयटीआयची पहिली यादी जाहीर

sakal_logo
By

आयटीआयची पहिली यादी जाहीर
प्रवेशासाठी  बुधवारअखेर मुदत; ६ ऑगस्टला दुसरी यादी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता.  ३०  :  राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील ८१ टक्के शासकीय संस्थात प्रवेश फुल्ल झाले आहेत. या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना  बुधवार  (ता.  ३) अखेर आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. दुसऱ्या यादीसाठी विद्यार्थ्यांना  याच कालावधीत  पसंतीक्रम भरण्याची मुदत आहे.  शनिवारी (ता.  ६) दुसरी यादी लागेल. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातर्फे गेल्या दोन  महिन्यांपासून आयटीआयची प्रवेश प्रकिया सुरू आहे. यातील प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे. यात पहिला पसंतीक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश सक्तीचा राहणार आहे. राज्यात शासकीय  ४१९ , तर खासगी  ५५६  अशा आयटीआयमध्ये सुमारे दीड लाख प्रवेश क्षमता आहे. यात शासकीयमध्ये  ७५  हजार  ७९९, तर खासगी संस्थात  १६  हजार  ३४१  विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मूळ गुणपत्रके, दाखले आणि शुल्क घेऊन संबंधित संस्थेत  बुधवारपर्यंत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे.
दुसऱ्या  यादीसाठी पसंतीक्रम भरण्याची  विद्यार्थ्यांना बुधवारअखेर संधी आहे. त्याची  शनिवारी सायंकाळी  यादी लागेल.  त्यात  पहिले तीन पसंतीक्रम सक्तीचे असून त्या विद्यार्थ्यांनी  १२ ऑगस्टअखेर  प्रवेश घ्यावयाचा आहे. तिसऱ्या फेरीसाठी  १२ ऑगस्ट अखेर पसंतीक्रम सादर करता येतील.  सोळा ऑगस्टला तिसरी यादी लागेल. या फेरीत पहिले पाच पसंतीक्रम सक्तीचे राहतील. या यादीतील विद्यार्थ्यांनी  २० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची  मुदत आहे.  २० ऑगस्टअखेर चौथ्या फेरीसाठी पसंतीक्रम, तर  २३ ऑगस्टला यादी लागेल.  त्यानंतर संस्थास्तरावरील शेवटची फेरी होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02369 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top