दहीहंडीसाठी गोविंदांनी थोपटले दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहीहंडीसाठी गोविंदांनी थोपटले दंड
दहीहंडीसाठी गोविंदांनी थोपटले दंड

दहीहंडीसाठी गोविंदांनी थोपटले दंड

sakal_logo
By

एक्यावरच ठरणार विजेत्यांचा फैसला!
गोविंदानी थोपटले दंड; पालकर, संघर्ष मंडळाचे सराव जोमात
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : दोन वर्षाच्या खंडानंतर गोविंदानी पुन्हा दंड थोपटले आहेत. केवळ आठ दिवसांवर आलेल्या दहीहंडीसाठी स्थानिक नेताजी पालकर व्यायामशाळा आणि संघर्ष ग्रुपचे गोविंदा भर पावसात जोमाने सराव करत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निबर्धांमुळे गोविंदाच्या उत्साहावर विरजण पडले होते. गेल्या महिनाभरापासून यंदा निर्बंध हटल्याने गोविंदा नव्या उत्साहाने सरावात दंग आहेत. जिगरबाज एक्यावरच विजेत्यांचा फैसला ठरणार आहे.
गेल्या दशकभरात येथील गोविंदा पथकांनी जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. खासकरून मोठ्या बक्षीस रकमेच्या स्पर्धा आणि गडहिंग्लजचे विजेते असे समीकरणच बनून गेले आहे. (कै.) नेताजी पालकर यांनी दोन दशकापूर्वी या गोविंदा पथकाच्या पंरपंरेची मुहूर्तमेढ रोवली. या पथकाने कोल्हापूरसह परगावच्या स्पर्धेतही झेंडा फडकविला. गेल्या दशकभरापासून नदीवेस परिसरातील संघर्ष ग्रुपनेही धडाकेबाज कामगिरी करीत प्रबळ आव्हान निर्माण केले आहे. संघर्षनेही अनेक बक्षिसे जिकूंन नावलौकिक वाढवला.
सांघिक कामगिरीचा कस पाहणाऱ्या या क्रीडाप्रकारात येथील नेताजी पालकर, संघर्ष ग्रुपने शिरोळ, सांगली जिल्ह्यातील गोविंदा पथकाची मक्तेदारी मोडून काढली. कोरोनाच्या निबंर्धामुळे गेली दोन वर्षे स्पर्धाच रद्द झाल्या. त्यामुळे गोविंदा पथकात मरगळ आली होती. पण, यंदा निर्बंध कमी झाले असून राज्य शासनानेच दहीहंडीसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करून या क्रीडाप्रकाराला जणू प्रोत्साहनच दिले आहे. साहजिकच यामुळे गोविंदाचा उत्साह दुणावला आहे.
एम. आर. हायस्कूल लगत मराठा मंडळ वसतिगृहाच्या प्रागंणात नेताजी पालकर व्यायामशाळेचा सराव सायंकाळी सुरू आहे. संघर्ष ग्रुपचा रात्री नऊनंतर शिवाजी चौकातील शिशु विहारच्या अंगणात सराव सुरू आहे. अधिक एक्के लावण्यावर भर असून तीन एक्के लावण्यात दोन्ही पथकांना यश मिळत आहे. मार्गदर्शक नेताजी पालकांराच्या विना होणारी ही पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर कोण बाजी मारणार याचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
--------------------
कोट
स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे थर लावण्याची संधी मिळणे यावरच यश अंवलबून आहे. किमान पाच-सहा थर रोज सरावात लावतो आहोत. उत्साहामुळे स्पर्धेवेळी अधिक चांगली कामगिरी होत असते.
- सोमनाथ नाईक, गोविंदा, संघर्ष ग्रुप
-------------------
रोज शंभरहून अधिक गोविंदाचा सरावात सहभाग आहे. यंदा आठ थर लावण्यासाठी जिद्दीने कसून सराव सुरू आहे. सहा, सात थराव लावण्यात गोविंदा यशस्वी ठरू लागल्याने विश्‍वास वाढतो आहे.
- गोपी मोहिते, गोविंदा, नेताजी पालकर व्यायाम शाळा

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02380 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..