दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

दिवाळीत राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
युनायडेच्या बैठकीत निर्णय; सतरावे वर्ष, बक्षिसाची रक्कम वाढविणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून दीवाळीत राष्ट्रीय फुटबाँल स्पर्धांची पंरपंरा पुन्हा सुरु होणार आहे. गेले दोन वर्षे कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. युनायटेडच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचे यंदाचे हे सतरावे वर्ष आहे. यावर्षी या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम वाढवण्याचा निश्चित झाले. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनायटेडचे अध्यक्ष मलिकार्जुन बेल्लद होते.
युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात दिवाळी स्पर्धेच्या पंरपंरेची माहिती दिली. जेष्ठ संचालक सुरेश कोळकी यांनी कोरोनाचे निर्बंध हटल्याने दीवाळीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घ्याव्यात अशी सुचना केली. संचालक संभाजी शिवारे यांनी त्याला अनुमोदन दिले. गडहिंग्लजची ओळख असलेली ही स्पर्धा गेली दोन वर्षे कोरोनाच्या निंर्बधामुळे ठप्प होती. ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. स्पर्धा समन्वयक म्हणून अभिजित चव्हाण, सुरज तेली यांची निवड करण्यात आली.
संचालक प्रशांत दड्डीकर यांनी वाढलेली महागाई लक्षात घेता स्पर्धेच्या खर्चात सुमारे २० टक्के वाढ होणार असल्याचे निर्दशनास आणले. खजिनदार महादेव पाटील यांनी स्पर्धा अंदाजपत्रकात तशी तरतूदीची सुचना केली. परराज्यातील संघाचा सहभाग लक्षात घेता स्पर्धेसाठी यंदा बक्षीस रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय झाला. एकुण अडीच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रवास, निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्थेविषयी चर्चा झाली. संचालक सतीश पाटील, सुनिल चौगुले, जगदीश पट्टणशेट्टी, अरविंद बार्देस्कर, रविंद्र हत्तरकी, उमेश देवगोंडा उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02382 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..