१०२ ॲंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१०२ ॲंकर
१०२ ॲंकर

१०२ ॲंकर

sakal_logo
By

पॉलिटेक्निकची आज
अंतिम गुणवत्ता यादी
प्रवेशप्रक्रिया ; गुरुवारी पहिली यादी, चार फेऱ्या होणार

ग़डहिंग्लज, ता. १७ : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष प्रवेशप्रकिया सुरू आहे. उद्या (ता. १८) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. पहिल्या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील शुक्रवारी (ता.१९) जाहीर होणार आहे. पहिली यादी २५ ऑगष्टला जाहीर होणार आहे. यंदा प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे आठ हजार प्रवेश अर्ज आले आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही दहावीचा निकाला आधीच २ जूनला प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. तब्बल दोन महिने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांत पॉलिटेक्निक प्रवेशाची चिंता लागून राहिली होती. विद्यार्थ्यांना http://poly22.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पक्की गुणवत्ता यादी पाहायला मिळेल. विविध अभ्यासक्रम आणि तंत्रनिकेतन निवडण्यासाठी विकल्प देण्याची पहिली फेरी २० ते २३ ऑगष्टअखेर आहे. गुरुवारी पहिली यादी जाहीर होईल. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० अखेर शुल्क आणि मूळ कागदपत्रे घेऊन संबंधित तंत्रनिकेतनात हजेरी द्यावयाची आहे.

चौकट...
प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
-फेरी कालावधी
*पहिली विकल्प फेरी २० ते २३ ऑगष्ट
*पहिली यादी २५ ऑगष्ट
*दुसरी विकल्प फेरी १ ते ४ सप्टेंबर
*दुसरी यादी ६ सप्टेंबर
*तिसरी विकल्प फेरी १३ ते १५ सप्टेंबर
*तिसरी यादी १७ सप्टेंबर

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02386 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..