पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

पॉलिटेक्निक तिसरी यादी जाहीर
प्रवेशप्रक्रिया : बुधवारअखेर मुदत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १८ : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पदविका आभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रथम वर्षात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची तिसरी यादी लागली आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना बुधवार (ता. २१) अखेर प्रवेश घेण्याची मुदत आहे. तिसऱ्या फेरी अखेरही वाढलेल्या मेरिटमध्ये बदल झालेला नाही. त्यामुळे पसंतीचा अभ्यासक्रम न मिळाल्याने अनेकांची निराशा कायम आहे. शासकीय कोल्हापूरचे तंत्रनिकेतन आणि गारगोटीचे अनुदानित आयसीआरई यातील बुहतांश जागा भरत आल्या आहेत. तिसऱ्या फेरीतील रिक्त जागासाठी संस्थास्तरावर शेवटची चौथी फेरी होणार आहे.
यावर्षी २ जूनला प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का वाढला. तसेच पॉलिटेक्निक प्रवेशाचा विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढला. त्यामळेच राज्याबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या संख्येने प्रवेश अर्ज आले. जिल्ह्यातील २० संस्थांतील सहा हजार जागांसाठी सुमारे आठ हजार अर्ज आल्याने प्रवेशासाठी चढाओढ वाढली. पहिली यादी २५ ऑगस्टला जाहीर झाली. यात शासकीय, अनुदानितमध्ये सरासरी ९५ तर खासगी संस्थांतही ८५ टक्क्यांवरच प्रवेश बंद झाला.
सहा सप्टेंबरला दुसरी यादी जाहीर झाली. मुख्यतः कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, सिव्हील अशा अभ्यासक्रमांना अधिक पसंती दिसली. पसंतीचा अभ्यासक्रम नसल्याने विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्या बेटरमेंट पर्यायाचा आसरा घेतला; पण वाढलेले मेरिट न उतरल्याने अखेर विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीतील पर्याय स्वीकारावा लागणार आहे. बुधवारअखेर विद्यार्थ्यांनी शुल्क, मूळ कागदपत्रे घेऊन संबंधित संस्थेत प्रवेश निश्‍चित करावयाचा आहे. या फेरीत रिक्त आलेल्या जागांसाठी पुढील आठवड्यात संस्था स्तरावर शेवटची फेरी होण्याची शक्यता आहे. या फेरीसाठी कोणतेही आरक्षण असणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02411 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..