फुले, फळांचा भाव वधारला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुले, फळांचा भाव वधारला
फुले, फळांचा भाव वधारला

फुले, फळांचा भाव वधारला

sakal_logo
By

52403
गडहिंग्लज : चंदगडी रताळी खरेदी करताना ग्राहक. (अमर डोमणे : काळ छायाचित्रसेवा)


फुले, फळांचा भाव वधारला
फळभाज्याही कडाडल्या; नारळ, रताळी, पान, खजुर, सुपारीला मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : येथील आठवडा बाजारात फुले, फळांचा भाव वधारला आहे. उद्यापासून (ता. २६) सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सावमुळे हा परिणाम झाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाजीमंडईत पालेभाज्यासह फळभाज्यांचे दर कडाडले आहेत. किलोमागे सरासरी दुपटीने दर वाढले आहेत. दोडका, ढब्बू, बिन्स, वांगी, हिरवी मिरचीचे भाव कडाडले आहेत. पुजेचे साहित्य, पान, सुपारीसह उपवासासाठी खजुरालाही मागणी वाढली होती.
आठवडाभरापासून नवरात्रौत्सावाची तयारी सुरू आहे. आज आठवडा बाजारात त्यामुळेच खरेदीसाठी गर्दी उसळली. पुजेचे साहित्य नारळ, अगरबत्ती, पाने, सुपारी आदीसाठी ग्राहकांची मागणी होती. नारळ १५ ते ३० रुपये आकारानुसार दर होता. पाने शेकडा तीस ते चाळीस रुपये दर होता. सुपारीच्या दरात दुपटीने वाढ झाली होती. दहा रूपये असा दर होता. झेंडू, शेवंती यांना अधिक मागणी दिसली. झेंडू ६० ते ८० रुपये, तर शेवंती ८० ते १२० रुपये किलो असा दर होता.
नवरात्रौत्सवात उपवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. खासकरून यात ज्येंष्ठांचे प्रमाण जास्त आहे. अशाकडून फळे, उपवासाचे साहित्याची खरेदी झाली. सफरचंद, बेर, मोसंबीसाठी ग्राहकांचा आग्रह होता. सफरचंद ८० ते १२० रुपये, बेर, मोसंबी, डाळींब ८० ते १३० रुपये किलो असा दर असल्याचे विक्रेते गजानन कांबळे यांनी सांगितले. खजूर २०० ते १००० रुपये किलो दर होता.
भाजीमंडईत गेल्या आठवड्यात पालेभाज्यांची आवक रोडावली होती. या आठवड्यात यात फळभाज्यांची भर पडली. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने हा परिणाम झाल्याचे तालूका भाजीपाला खरेदी विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. दहा किलोमागे दुपटीने दर वाढले होते. किलोला सरासरी २० ते ३० रुपयांनी दर वाढले होते. पालेभाज्या, कोथिंबीर २० ते ३० रुपये पेंढी होती. दहा किलोचे दर असे : टोमॅटो २५०, कोबी १५०, हिरवी मिरची ४५०, दोडका ६५०, ढब्बू ७५०, बिन्स ९००, वांगी ४५० रुपये.
----------------
चौकट
रताळी महागली
चंदगड तालुक्यातून आलेल्या रताळ्याचे दर मागणीमुळे वधारला होता. रताळ्यांना उपवासासाठी मागणी वाढली होती. किलोचा दर ५० ते ६० रुपयांवर पोहचला होता. किलोमागे वीस रुपयांनी दर वाढला आहे.